Vinayak Mete Passed Away : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं संघर्ष करणारा नेता, मेटेंच्या निधानानं पोकळी निर्माण झाली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vinayak Mete Passed Away : मेटे यांच्या निधनाची दु:खद बातमी सकाळी कळली. मेटे यांचं अपघाती निधन झालं. मेटे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं संघर्ष करणारा नेता, मुख्यमंत्री शिंदेंची भावना.

Vinayak Mete Passed Away : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं संघर्ष करणारा नेता, मेटेंच्या निधानानं पोकळी निर्माण झाली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 9:28 AM

मुंबई : आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं. आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. ही घटना खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ घडली. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला.  मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती त्यासाठी ते मुंबईच्या दिशेनं येत असल्याची होते. अपघात ते गंभीररित्या जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मराठा समाजाच्या न्याय-हक्कासाठी लढणारा माणूस महाराष्ट्रानं गमावला. ही राज्यासाठी मोठी पोकळी असल्याची प्रतिक्रिया दिग्गजांनी विनायक मेटेंच्या निधनावर (Vinayak Mete Passed Away) व्यक्त केली आहे. विनायक मेटेंच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री काय म्हणालेत?

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. ‘शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनाची दु:खद बातमी सकाळी कळली. माझाही विश्वास बसला नाही. मेटे यांचं अपघाती निधन झालं. मेटे म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं संघर्ष करणारा नेता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे देखील ते अध्यक्ष होते. त्यांचा एकच ध्यास होता की आता तुम्ही दोघेही आहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, मराठा समाजाल न्याय मिळेल, असं मेटे त्यांना म्हणाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटलंय. सरकार त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणालेत. विनायक मेटे यांची मराठा समाजासाठी जी भावना होती, ती मोठी होती, असंही शिंदे यावेळी म्हणालेत.

चौकशी केली जाईल

अपघात झाल्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात दिरंगाई झाली, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. यावेळी या संपूर्ण प्रकरणाची माहिती चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर संपूर्ण अपघात प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत.

बैठकीला येताना अपघात

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हे मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती त्यासाठी ते मुंबईच्या दिशेनं येत होते.  पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. ही घटना खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ घडली.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.