AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पदवीधर निवडणूक : विश्वजीत कदम आणि भाजप उमेदवाराची भेट, मतदाना दिवशीच्या भेटीने भुवया उंचावल्या

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांची अचानक भेट झाली. Vishwajeet Kadam

पदवीधर निवडणूक : विश्वजीत कदम आणि भाजप उमेदवाराची भेट, मतदाना दिवशीच्या भेटीने भुवया उंचावल्या
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Dec 01, 2020 | 11:09 AM
Share

सांगली: पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे आज काँग्रेसचे नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांची अचानक भेट झाली. पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्राच्या बाहेरील एका कार्यकर्त्याच्या घरामध्ये दोन्ही नेते एकत्र दिसले. मतदानाच्या दिवशीच दोन विरोधी पक्षांच्या नेत्यांमधील  भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, निवडणूक ही खिलाडूवृत्तीने लढवायची असते ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले. (Vishwajeet Kadam meet Sangram Deshmukh)

केंद्र सरकार हे लोकशाहीच्या विचाराने काम करत नसून हुकुमशाहीच्या विचाराने काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे, असा आरोप विश्वजित कदम यांनी केला.

महाविकास आघाडीचं वर्षभरातील काम चांगलं आहे. महाविकासआघाडी सरकारचं कामकाज उत्तम आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूनं जनमत आहे, याचं भाजप नेत्यांना वाईट वाटत आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून महाविकास आघाडीचे सरकार चांगले करत असल्याचं भाजप नेत्यांना आता स्पष्ट कळून चुकले आहे.

विरोधी पक्षाचा नाइलाज झाल्यामुळे नारायण राणे यांच्यासारखे नेते उलट सुलट वक्तव्य करत आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे सरकार अस्थिर होईल असा त्यांचा गैरसमज आहे. महा विकास आघाडीचे सरकार स्थिर आणि भक्कम असून यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असं कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले. (Vishwajeet Kadam meet Sangram Deshmukh)

भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजयाचा दावा

भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला. पुणे पदवीधर भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. ही निवडणूक एकतर्फी होती, मोठ्या मताधिक्क्यानं विजयी होणार असल्याचा दावा संग्राम देशमुख यांनी केला आहे.

पुणे पदवीधर निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी पलूस येथे मतदान केले तर भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मतदान केले. पुणे पदवीधर मतदार संघात 3 लाख 65 हजार पदवीधर मतदान असून 62 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.(Vishwajeet Kadam meet Sangram Deshmukh)

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार अरुण लाड यांनी पुणे पदवीधर मतदारसंघ हा आपल्या मालकीचा आहे असं ज्या पक्षांना वाटत होतं हे चित्र मतदारांनी यावेळी बदललं आहे. सुशिक्षित आणि गावातील, शहरातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मतदार नक्कीच मला विजयी करतील, अशी आशा आहे, असं अरुण लाड म्हणाले.

पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार

अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संग्रामसिंह देशमुख (भाजप) रुपाली पाटील ( मनसे ) शरद पाटील ( जनता दल ) सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी ) श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक) डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष) अभिजित बिचुकले (अपक्ष)

संबंधित बातम्या:

Graduate Constituency Elections LIVE | विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकांसाठी मतदान

कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा

(Vishwajeet Kadam meet Sangram Deshmukh)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...