रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनार्थ मतदान, शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी

| Updated on: Jun 23, 2021 | 10:25 AM

राजापूर नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं ही कारवाई करण्यात आली. (Voting in support of Ratnagiri refinery removed of Shiv Sena corporator from the party)

रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनार्थ मतदान, शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी
राजन साळवी आणि प्रतिक्षा खडपे
Follow us on

रत्नागिरी : राजापूर नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं ही कारवाई करण्यात आली. राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांच्यावर ही कारवाई केलीय. (Voting in support of Ratnagiri refinery removed of Shiv Sena corporator from the party)

प्रतिक्षा खडपे यांची पक्षातून हक्कालपट्टी

मंगळवारी राजापूर नगरपरिषदेने रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव मांडला. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेच्या दोन नगरसेविकांनी समर्थन देत हा ठराव मंजूर केला. शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांना या ठरावाला पाठिंबा देत मतदान केलं. त्यामुळे प्रतिक्षा खडपे यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आलीय.

आमदार राजन साळवेंकडून कारवाई

राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्याकडून प्रतिक्षा खडपे यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांनी पक्षाच्या विरोधात मतदान करून विरोधकांना पाठिंबा दिल्याचं कारवाईचे कारण देण्यात आलंय.

राजापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन होती. या ऑनलाईन सभेला ठरावाच्या बाजूने मतदान करताना शिवसेनेच्या आणखी एक दुसरी नगरसेविका ऑनलाईन नव्हती. त्या नगरसेविकेनेही ठरावाच्या बाजूने मतदान केलंय. त्यामुळे सभेच्या ठरावावर ज्या वेळी या नगसेविकेची सही होईल त्यावेळी या नगसेविकेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

राजापूर नगर परिषदेचा ठराव मंजूर

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हायला हवा, यासाठी आवाज उठलेला असताना राजापूर नगर परिषदेने देखील रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन करताना तसा ठराव पारित केला आहे. हा ठराव अकरा विरुद्ध पाच असा पारित झालेला आहे.

(Voting in support of Ratnagiri refinery removed of Shiv Sena corporator from the party)

हे ही वाचा :

शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांची अटक टळली, पोलीस स्टेशन तोडफोड प्रकरणात जामीन

OBC विरोधात ठाकरे सरकारचं षडयंत्र, बावनकुळेंचा हल्ला, निवडणुका होऊ देणार नाही, शेंडगेंचा एल्गार