Video | ‘बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं असावं!’ ती गोष्ट पाहून मोदीही सुप्रिया-पवारांकडे बघत राहिले

Supriya Sule & Sharad Pawar : प्रिया सुळे आणि शरद पवार हे एकत्र लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. आपल्या बाबांची मदत करण्यासाठी, त्यांना काहीही कमी-जास्त व्हायला नको, त्रास व्हायला नको, याची काळजी...

Video | 'बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं असावं!' ती गोष्ट पाहून मोदीही सुप्रिया-पवारांकडे बघत राहिले
आणि मोदीही सुप्रिया सुळेंची ती कृती पाहून अवाक् झाले..
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 11:37 PM

मुंबई : शिवाजी पार्कात लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी (Funeral of Lata Mangeshkar) रथी-महारथींनी हजेरी होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील तिथं जातीनं हजर होतं. यावेळी दिग्गजांनी लता मंगेशकर यांचं अंतिम दर्शन घेतलं. त्यांना आदरांजली वाहिली. लता मंगेशकर यांचं पार्थिव शिवतीर्थावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींसह (Celebrities in Bollywood) बडे राजकीय नेते मंडळीही श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कात हजर होते. यावेळी घडलेल्या या प्रसंगानं नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधून घेतलं. बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं असावं, अशी प्रतिक्रिया देखील अनेकांनी दिली आहे. नेमका हा प्रसंग कॅमेऱ्यातही कैद झाला. खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे बाबा शरद पवार (Supriya Sule & Sharad Pawar) यांच्यात घडलेला हा विशेष प्रसंग पाहून नरेंद्र मोदीही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.

नेमकं काय घडलं?

सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. यानंतर ते खाली येऊन खूर्चीवर बसलेही. त्यांच्यापाठोपाठ राज्यपाल, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही अंत्यदर्शनं घेतलं. दरम्यान, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही यावेळी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, आदर पूर्वक जायला हवं, म्हणून ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या शरद पवार यांनी आपल्या पायातील बूट खालीच काढले होते. यानंतर ते खाली उतरले तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी जे पाऊल उचललं, ते कौतुकास्पद होतं, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

बापलेकीचं नातं..

वडीलांना त्रास होतोय, कष्ट घ्यावे लागतील, त्यांना मदतीची गरज आहे, हे लगेचच सुप्रिया सुळे यांनी हेरलं. आपल्या पदाचा, राजकीय वलयाचा कसलाही विचार मनी न बाळगता, सुप्रिया सुळे यांनी आपल्या बाबांना अर्थात शरद पवार यांना पायात बूट घालण्यासाठी त्या लगेचच पुढे सरसावल्या. यावेळी समोरच बसलेल्या नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना एका खूर्चीवर बसवलं. आपण स्वतः गुडघ्यावर बसून त्यांनी वडिलांच्या पायात बूट घालून देत त्यांची सेवा केली. आपल्या हातांनी त्यांनी केलेली ही गोष्ट छोटीशी जरी असली, तरी कॅमेऱ्यात टिपली गेली, जिला महत्त्व आलं नसतं तरच नवल! सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे एकत्र लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. आपल्या बाबांची मदत करण्यासाठी, त्यांना काहीही कमी-जास्त व्हायला नको, त्रास व्हायला नको, याची काळजी घेताना खासदार सुप्रिया सुळे यावेळी शिवाजी पार्कात दिसून आल्यात.

पाहा तो खास व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

Video | पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कात आले! पवारांच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उठले आणि…

मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंचा संवाद, राज्यपालांची नजर खाली! नेमकी काय चर्चा?

किरीट सोमयांना किलीट तोमय्या म्हणण्यावरून ‘सामना’! असीम सरोदे म्हणतात, हा तर…

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.