Eknath Shinde : आम्ही म्हणजेच शिवसेना शिंदेंचा विधानभवनात पुनरुच्चार; भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचेही मानले आभार

आम्ही म्हणजेच शिवसेना असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे देखील आभार मानले आहेत.

Eknath Shinde : आम्ही म्हणजेच शिवसेना शिंदेंचा विधानभवनात पुनरुच्चार; भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचेही मानले आभार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 1:05 PM

मुंबई : आज विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांनी बाजी मारली. राहुल नार्वेकर हे विधानसभेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. दरम्यान राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन ठारावावेळी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तसेच राज्यात सध्या भाजप (BJP), शिवसेना यांचे सरकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. आज विधानसभेत बोलताना राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार सत्तेत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह शिवसेनेतील इतर नेत्यांना देखील टोला लगावला आहे. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्वृत्वाचे देखील आभार मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं?

मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक आहे. मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्री होते. तसेच 40 पेक्षा अधिक आमदारांचा मला पाठिंबा होता. या मंत्र्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. मात्र तरी देखील ते माझ्यासोबतच राहिले. अनेक जण आमच्या संपर्कात 12 आमदार आहेत, 15 आमदार आहेत असा दावा करत होते. आम्ही आमच्यासोबत येण्यासाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही. मी तर त्यांना म्हणत होतो, जे आमदार तुमच्यासोबत आहेत त्यांची नावे मला पाठवून द्या मी त्यांना विमानाने मुंबईत पाठवून देतो, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाचे मानले आभार

दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे देखील आभार मानले. त्यांच्याकडे 115 आमदार होते, माझ्याकडे 50 च आमदार होते. पण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि मला मुख्यमंत्री केले. सर्वांना असेच वाटत होते की, आता देवेंद्रजी फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार. मी पुन्हा एकदा सांगतोय मला खरच काही नको होते, मी भाजपाला केवळ वैचारीक भूमिकेसाठी पाठिंबा दिला  होता. मात्र अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद मला मिळाले. यासाठी मोदी, शाह, जेपी नड्डा यांचे आभार मानतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.