.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anurag Thakur : नव्या राजकीय मित्राबाबत काय म्हणाले केंद्रीय मंत्री, निशाणा मात्र जुन्या मित्रावर..!

मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. आगामी निवडणूकांमध्ये डबल इंजिन असलेल्या सरकारला साथ देण्याचे आवाहन ठाकूर यांनी मुंबईकरांना केले आहे.

Anurag Thakur : नव्या राजकीय मित्राबाबत काय म्हणाले केंद्रीय मंत्री, निशाणा मात्र जुन्या मित्रावर..!
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Sep 18, 2022 | 12:54 PM
Share

मुंबई : राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे राज्यातील घडामोडीने स्पष्ट झालेच आहे. तरी (Politics) राजकारणातली मैत्री म्हटले की, समोर येते ती  (Shiv sena- BJP Party ) शिवसेना-भाजपाची युती. 25 वर्षाच्या युतीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तर दुसरीकडे नवा मित्र म्हणून भाजपाच्या जोडीला शिंदे गट गेला आहे. राजकारणातील या मैत्रीबाबत काय वाटते असा सवाल (Anurag Thakur) केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी दिलेल्या उत्तरातून अनेक अर्थ निघू शकतात. मित्राला मित्रापासून घाबरण्याची गरज नाही असे म्हणत शिंदे गटाला जवळ केले तर जुना मित्र राहिलेल्या शिवसेनेला अधिक अंतर दिले आहे. हा शब्दांचा खेळ असला तरी ठाकूर यांचा निशाणा शिवसेनेवर होता हे आता काही लपून राहिलेले नाही.

‘मिशन लोकसभा’ च्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदार संघात होते. कल्याण मतदारसंघाचा दौरा आटोपून ते मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आले होते. ठाकूर यांच्यावक कल्याण लोकसभा मतदार संघाची जबाबदारी होती. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी अंबरनाथ येथे रॅलीही काढली होती.

इंदू मिलमध्ये सुरु असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीला उशिर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याला उत्तर देताना त्यांनी मोदी सरकारचे योगदान निदर्शनास आणून दिले आहे. स्मारकाचे जे काही काम होत आहे ते मोदी सरकारनेच केले असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाहीतर 14 एप्रिलला सुट्टीचा निर्णय देखील मोदी सरकारच्या काळात झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण आणि ठाणे मतदार संघात शिंदे गटाचे खासदार असले तरी भाजपाने या मतदार संघात तयारी सुरु केली आहे. मात्र, आम्ही एकच असल्याचे म्हणत ठाकूर यांनी त्या प्रश्नावर सावरासावर केली. तर खा. श्रीकांत शिंदे यांना तर आपण भेटलो आहोतच पण राहुल शेवाळे यांना देखील भेटणार असल्याचे ते म्हणाले आहेत. आम्ही सोबत येऊन जनतेची कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. आगामी निवडणूकांमध्ये डबल इंजिन असलेल्या सरकारला साथ देण्याचे आवाहन ठाकूर यांनी मुंबईकरांना केले आहे. त्यामुळे मिशन लोकसभा बरोबरच ठाकूर यांनी मुंबई महापालिकेसाठीही दौरा असल्याचे दाखवून दिले आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर