AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या विमान अपघातादिवशी नेमकं काय घडलं? रोहित पवारांनी प्रत्येक मिनिटाची दिली माहिती

Rohit Pawar On Ajit Pawar Death : अजित दादांच्या अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

अजितदादांच्या विमान अपघातादिवशी नेमकं काय घडलं? रोहित पवारांनी प्रत्येक मिनिटाची दिली माहिती
Rohit Pawar press Ajit PawarImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 10, 2026 | 4:41 PM
Share

अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारातमीजवळ विमान अपघातात निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित दादांच्या अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. अशातच आज अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दादा कुठे बसले होते?

रोहित पवार यांनी म्हटले की, दादांचा मुंबई ते बारामती प्रवास. 210 किलोमीटर, 27 मिनिट लागणार होतं. व्हिएसआर नावाच्या कंपनीचं विमान होतं. अमेरिकेत विमान तयार झालं. विमानात लेफ्ट साईटला दादा बसले असावेत. दुसऱ्या सेक्शनमध्ये बॅगा होत्या. पाठी मागे. पेट्रोलच्या टाक्या आहेत. या कंपनीची लेअरजेटच्या बाबत त्यांची देशात मोनोपॉली आहे. सर्वाधिक लेअरजेटची विमाने त्यांच्याकडे आहे.

अपघाताच्या दिवशी काय घडलं?

दादांच्या अपघाताच्या दिवशी 7 वाजून 2 मिनिटाला क्रूर पोहोचले. कॅप्टनने चेक केलं. बारामती एअरपोर्टला फोन केला असेल. व्हिजीबिलीटी आहे का विचारलं. 7 वाजून 10 मिनिटाने ओकेचा मेसेज आला. दादांचे पीसए विदीप जाधव आले. दादा 7.30 वाजता पोहोचले. विमानाने उड्डाण केले. 8.22 ला विमान लोणावळा. 8.25 वाजता पुण्याजवळ, 8.30 वाजता यवतला. 8.32 ला सुपेजवळ पोहोचले. त्यानंतर 8.43 ते 8.45 दरम्यान अपघात होता. 9 वाजता दादा जखमी असल्याची बातमी आली. पण 9.45 वाजता दादा गेल्याची बातमी आली. त्यामुळे मन आणि डोकं सुन्न झालं.

16 वर्षे जुनं विमान होतं

पुढे बोलताना रोहित पवार म्हटले की, विमानाचं अॅप आहे. युनिव्हर्सल अॅप आहे. त्यात गेल्यावर किती वर्षापूर्वीचं विमान होतं हे कळतं. हे विमान 16 वर्षापूर्वीचं आहे. 25 आणि 26 ला हे विमान सुरतला जाऊन आलं होतं. कंपनीचे मालक सिंग म्हणाले, विमान चांगल्या स्थितीत होते. मेंटेन होते. वैमानिक अनुभवी आहे. अपघात व्हिजिबिलीटीमुळे झाल्याची शक्यता आहे. गावाच्या वरून विमान गेलं तेव्हा लोकांनी सांगितले की आवाज वेगळा येत होता. म्हणजे मेंटेनन्समध्ये प्रॉब्लेम असेल. विमान आलं टिल झालं आणि पडलं. हे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसलं असंही रोहित पवार म्हणाले.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन