AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 जे पंजाबमध्ये घडलं ते गुजरातमध्ये घडणार काय, अरविंद केजरीवाल यांनी लिहूनचं दिलं

गुजरातमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे, असं लिहून त्याखाली अऱविंद केजरीवाल यांनी स्वतःची सही केली आहे.

 जे पंजाबमध्ये घडलं ते गुजरातमध्ये घडणार काय, अरविंद केजरीवाल यांनी लिहूनचं दिलं
अरविंद केजरीवाल
| Updated on: Nov 27, 2022 | 10:29 PM
Share

यंदा गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता येईल. असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कागदावर लिहून दिलं. त्यानंतर त्यांनी स्वतःची सही केली. याआधीसुद्धा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये लिखित स्वरुपात सत्तेचा दावा केला होता. अरविंद केजरीवाल म्हणाले, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची सरकार बनतं आहे. ही भविष्यवाणी तुम्ही नोट करून ठेवा. ही भविष्यवाणी खरी ठरेल, असा दावा अऱविंद केजरीवाल यांनी केला. आठवड्याभरात अऱविंद केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा हा दावा केलाय. त्यामुळं राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या.

गुजरातमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे, असं लिहून त्याखाली अऱविंद केजरीवाल यांनी स्वतःची सही केली आहे. पंजाबमध्ये मी काही भविष्यवाणी केली होती. गुजरातमध्ये आम आदमी सरकारची सरकार बनत आहे. २७ वर्षांच्या शासनानंतर जनतेकडून लोकांना रिलीफ मिळेल.

गुजरातमध्ये आपचं सरकार येईल, हे अऱविंद केजरीवाल यांना पडलेलं स्वप्न आहे. गुजरातमध्य आपचं सरकार येऊ शकत नाही, असं भाजपचं म्हणणंय. जनमत भाजपच्या पाठीमागे असल्याचं त्यांचं म्हणणंय.

प्रत्येक पक्ष निवडणुकीत विजयाचा दावा करतो. मात्र, केजरीवाल यांनी हे सर्व लिखित स्वरुपातंच दिलं. पंजाबमध्ये मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवरून पराभूत होतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं. शेवटी झालं तसचं. प्रत्येक्षात चन्नी दोन्ही जागांवरून पडले.

भगवंत मान हे ५१ हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकतील. मान ५८ हजार मतांनी जिंकले. बादल परिवाराचे पाचही सदस्य पराभूत होतील, असंही लिहूनं दिलं होतं. खरोखरचं बादल परिवाराचे पाचही कुटुंबीय पराभूत झाले. निकालानंतर आपची सरकार येईल, ही चौथी गोष्ट लिहून दिली होती. झालं तसंच पंजाबमध्ये आपची सत्ता आली.

त्याआधी दिल्लीत काँग्रेसच्या शून्य जागा येतील, हे केजरीवाल यांनी लिहून दिलं होतं. तेही खरं ठरलं होतं. भाजप म्हणते आमच्या स्पर्धेत काँग्रेस आहे. पण, काँग्रेस कुठही नसल्याचं आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.