निवडणूक संपली, आता VVPAT चिट्ठ्यांचं पुढे काय होणार?

नवी दिल्ली : यावर्षीची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी वेगळी आणि विशेष ठरली. त्यातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरात पहिल्यांदाच EVM सोबत वापरण्यात आलेले VVPAT मशीन. EVM मधील मतदानाची तपासणी करता यावी आणि मतदारांना आपले मत योग्य उमेदवारालाच जात आहे ना हे तपासण्याची सोय म्हणून या निवडणुकीत VVPAT मशीन वापरण्यात आले. लोकसभा निवडणूक संपली आणि आता नव्या […]

निवडणूक संपली, आता VVPAT चिट्ठ्यांचं पुढे काय होणार?
Follow us
| Updated on: May 28, 2019 | 3:13 PM

वी दिल्ली : यावर्षीची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी वेगळी आणि विशेष ठरली. त्यातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरात पहिल्यांदाच EVM सोबत वापरण्यात आलेले VVPAT मशीन. EVM मधील मतदानाची तपासणी करता यावी आणि मतदारांना आपले मत योग्य उमेदवारालाच जात आहे ना हे तपासण्याची सोय म्हणून या निवडणुकीत VVPAT मशीन वापरण्यात आले. लोकसभा निवडणूक संपली आणि आता नव्या सरकारच्या शपथविधीचा दिवसही ठरला. मग आता निवडणूक मतदानातील VVPAT चिट्ठ्यांचं पुढे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला असणार. या चिट्ठ्या रद्दीत जाणार की यांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही विशेष उपाययोजना केली जाणार याचेही उत्तरे समजून घ्यायला अनेकांना आवडेल.

एका VVPAT मशीमध्ये जवळजवळ 1400 चिट्ठ्या असतात. केवळ दिल्लीचे उदाहरण घेतले, तर तेथे मतदानादरम्यान 13 हजार 819 VVPAT मशीन वापरण्यात आले होते. मतमोजणी आणि निकालानंतर आता या चिट्ठ्यां पुन्हा VVPAT मध्ये सील करुन ठेवण्यात आल्या आहेत. VVPAT सोबत EVM देखील सील करण्यात आले. मतमोजणी होऊन निकाल घोषित झाल्यानंतर या सर्व EVM आणि VVPAT मशीनला 45 दिवसांसाठी सुरक्षित ठेवले जाते.

VVPAT मधील चिट्ठ्यांवरील शाई उडून जाऊ नये म्हणून हे सर्व मशीन पूर्ण अंधार आहे अशाच जागी ठेवण्यात येईल. मशीन हवा आणि प्रकाश यांच्या संपर्कात येऊ नये म्हणून प्रत्येक मशीन काळ्या पॉलिथीन बॅगमध्ये सील करण्यात आले आहे.

जर कुणाला निवडणुकीबद्दल कोणताही आक्षेप असेल तर त्या व्यक्तीला निकालापासून 45 दिवसांच्या आत याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते. न्यायालयाच्या आदेशानुसारच संबंधित मशीन पुन्हा तपासले जाते किंवा सुरक्षित ठेवले जाते.

जर कोणताही आक्षेप नोंदवला गेला नाही किंवा उच्च न्यायालयाकडून EVM च्या तपासणीचे कोणतेही आदेश नसतील, तर अशावेळी ही मशीन्स पुढील निवडणुकीसाठी तयार करण्याचे काम सुरु केले जाते. पुढील निवडणुकीसाठी EVM तयार करताना प्रत्येक EVM ची बॅटरी बदलली जाते. मतदानादरम्यान EVM मध्ये कोणताही फेरफार होऊ नये म्हणून ते पूर्णपणे सील केले जाते. त्यामुळे जर तिच बॅटरी वापरली तर मशीन मतदान सुरु असतानाच बंद पडण्याचा धोका असतो. म्हणून कोणत्याही नव्या निवडणुकीसाठी EVM तयार करताना सर्वात आधी त्याची बॅटरी बदलली जाते. दुसरीकडे VVPAT ची बॅटरी मतदान सुरु असतानाही बदलता येण्याची सोय उपलब्ध आहे.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.