कोण आहेत पारनेरचे 5 नगरसेवक, ज्यांच्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस?

| Updated on: Jul 07, 2020 | 2:42 PM

पारनेर तालुक्यातील राजकारणाने थेट राज्यातील राजकारणावर परिणाम केल्याचं पाहायला मिळत आहे (Who are the five corporators of Shivsena in Parner).

कोण आहेत पारनेरचे 5 नगरसेवक, ज्यांच्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस?
Follow us on

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील राजकारणाने थेट राज्यातील राजकारणावर परिणाम केल्याचं पाहायला मिळत आहे (Who are the five corporaors of Shivsena in Parner). शिवसेनेतून निवडून आलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर याचे पडसाद थेट राज्याच्या स्तरावर उमटले. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत अजित पवार यांना सेनेचे नगरसेवक परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना पाठवला. यामुळे राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारे हे पारनेरचे 5 नगरसेवक कोण याविषयी बरिच उत्सुकता आहे.

नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, डॉ. सय्यद, किसन गंधाडे अशी राज्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांची नावं आहेत. त्यांनी 4 जुलै रोजी शिवसेनेला रामराम ठोकत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर शिवसेनेने देखील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या रणनीतीचा वचपा काढत कल्याणमध्ये नवी राजकीय खेळी केली. यानुसार शिवसेनेनं कल्याण पंचायत समितीमध्ये थेट भाजपशी हातमिळवणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 


नुकतीच कल्याण पंचायत समिती सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक झाली. याठिकाणी भाजपचे 5, शिवसेनेचे 4 तर राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी यांची युती असून ते राज्यात सत्तेत आहेत. त्यामुळे कल्याण पंचायत समितीत याच दोन्ही पक्षांचे सभापती आणि उपसभापती निवडून येतील असा अंदाज होता. सभापती व उपसभापतिपद राष्ट्रवादीला देण्याचे आधीच निश्चित झाले होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रविवारी (5 जुलै) चक्रे फिरली. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या पारनेरमधील राजकीय खेळीचा वचपा काढत दणका दिला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पारनेरमधील शिवसेनेचे 5 नगरसेवक परत पाठवा, असा निरोप अजित पवारांना पाठवला.

सत्ता अबाधित राखायची असेल तर सेनेचे नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला. पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना कळवला.

महाविकास आघाडीत मित्रपक्ष असतानाही राज्यात इतर ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांनाच आपल्या पक्षात घेण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयाबद्दल शिवसैनिकांकडून चांगलीच नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे काही तक्रारी आल्याचीही माहिती आहे.

हेही वाचा :

सत्ता अबाधित राखायची असेल तर सेनेचे नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना थेट निरोप

शिवसेनेला धक्का, पाच नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पारनेरमधील फोडाफोडीनंतर शिवसेनेने ‘करुन दाखवले’, राष्ट्रवादीला कल्याणमध्ये दणका

Who are the five corporaors of Shivsena in Parner