शिवसेनेला धक्का, पाच नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शिवसेनेला धक्का, पाच नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

बारामती : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतमध्ये शिवसेनेला (5 Shivsena Corporators Join NCP) धक्का बसला आहे. पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar ) यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हे देखील उपस्थित होते (5 Shivsena Corporators Join NCP).

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वात नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

आमदार नीलेश लंके यांची बुलेट राईड

आमदार नीलेश लंके यांनी आज बारामतीतील व्हीआयआयटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या विश्रामगृहात त्यांनी बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी मोहसीन पठाण यांनी नवीन बुलेट घेतल्याचे समजल्यानंतर नीलेश लंके यांनी नवीन गाडीची राईड देणार का?, असं विचारत थेट बुलेटचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी बुलेटवरुन विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या परिसरात फेरफटका मारला (5 Shivsena Corporators Join NCP).

आमदार असलेल्या नीलेश लंके यांचा हा साधेपणा हे दृश्य पाहणाऱ्यांसाठी आश्चर्याचा धक्का आणि बुलेट घेणाऱ्या मोहसीन पठाण यांच्यासाठी अभिमानास्पद ठरला.

5 Shivsena Corporators Join NCP

संबंधित बातम्या :

….तर सरकार आणि व्यक्तीश: मुख्यमंत्र्यांना मोठी किंमत मोजावी लागू शकते, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शरद पवारांचं परखड मत, सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

पुण्यात कोरोना आटोक्यात न आल्यास परिणाम भोगावे लागतील, अजित पवारांकडून अधिकारी धारेवर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *