पारनेरमधील फोडाफोडीनंतर शिवसेनेने 'करुन दाखवले', राष्ट्रवादीला कल्याणमध्ये दणका

भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांची गुफ्तगू झाली आणि राष्ट्रवादीला दोन्ही पदे देण्याऐवजी कल्याण पंचायत समितीत भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

पारनेरमधील फोडाफोडीनंतर शिवसेनेने 'करुन दाखवले', राष्ट्रवादीला कल्याणमध्ये दणका

कल्याण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत गेले, याचा वचपा शिवसेनेने कल्याण आणि अंबरनाथ पंचायत समितीच्या निवडणुकीत काढला. सेना-भाजपच्या हातमिळवणीमुळे कल्याण पंचायत समितीत राष्ट्रवादीने सभापती आणि उपसभापतीपद गमावले. अंबरनाथमध्ये सेनेने सभापतीपद स्वत:कडे ठेवत भाजपला उपसभापती पदाची खुर्ची दिले. (Kalyan Ambernath Election Shiv Sena surprises NCP by reuniting with BJP)

कल्याण आणि अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. कल्याणमध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीचे 3 असे पंचायत समिती सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरल्यानुसार सभापतीपद आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्यात येणार होते.

माशी कुठे शिंकली?

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ठरल्यानुसार शिवसेनेचे सभापती व उपसभापतीपदाचे उमेदवार रविवारी अर्ज मागे घेणार होते. मात्र मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांची रविवारी सकाळी गुफ्तगू झाली आणि राष्ट्रवादीला दोन्ही पदे देण्याऐवजी भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

हेही वाचा : शिवसेनेला धक्का, पाच नगरसेवकांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

भाजप आमदार किसन कथोरे आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी कल्याण बाजार समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडण्याचे ठरवले. निवडणुकीत शिवसेनेच्या अनिता दशरथ वाकचौरे यांनी सभापतीपदी बाजी मारली, तर शिवसेनेचे रमेश बांगर उपसभापतीपदी विराजमान झाले.

हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

हात उंचावून झालेल्या मतदानामध्ये शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांना 7, तर राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना 5 मते मिळाली. उपसभापतीपदी शिवसेनेच्या रमेश बांगर यांना 7, तर राष्ट्रवादीसोबत गेलेले शिवसेनेचे उमेदवार भरत भोईर यांना 5 मतांवर समाधान मानावे लागले.

पारनेरमध्ये काय झाले?

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला. पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हेदेखील उपस्थित होते. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

(Kalyan Ambernath Election Shiv Sena surprises NCP by reuniting with BJP)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *