अर्ज भरताना नरेंद्र मोदी ज्या वृद्ध महिलेच्या पाया पडले, त्या कोण आहेत?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, जिल्हाधिकारी कार्यालयात एका वृद्ध महिलेच्या पाया पडले. ही महिला कोण, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. तर पंतप्रधान मोदी ज्यांच्या पाया पडले, त्या अन्नपूर्णा शुक्ला आहेत. मोदींनी अन्नपूर्णा शुक्ला यांची प्रस्तावक म्हणून निवड केली […]

अर्ज भरताना नरेंद्र मोदी ज्या वृद्ध महिलेच्या पाया पडले, त्या कोण आहेत?
Follow us on

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, जिल्हाधिकारी कार्यालयात एका वृद्ध महिलेच्या पाया पडले. ही महिला कोण, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. तर पंतप्रधान मोदी ज्यांच्या पाया पडले, त्या अन्नपूर्णा शुक्ला आहेत. मोदींनी अन्नपूर्णा शुक्ला यांची प्रस्तावक म्हणून निवड केली होती.

कोण आहेत अन्नपूर्णा शुक्ला?

अन्नपूर्णा शुक्ला (Annapurna Shukla) या मदन मोहन मालवीय यांच्या दत्तक कन्या आहेत. अन्नपूर्णा शुक्ला या बनारस हिंदू विद्यापीठाच्या महिला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य आहेत. अन्नपूर्णा शुक्ला यांनी बनारस हिंदू विद्यापीठातूनच वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. नव्वदीपार वय असतानाही अन्नपूर्णा शुक्ला अजूनही सामाजिक कार्यात सक्रीय असतात. लहुराबीर येथील काशी अनाथाश्रमाच्या वनिता पॉलिटेक्निकच्या त्या मानद संचालिका आहेत. वनिता पॉलिटेक्निकची स्थापनाही 1991 साली अन्नपूर्णा शुक्ला यांनीच केली होती. अन्नपूर्णा शुक्ला यांचे पती बीएन शुक्ला हे गोरखपूर वीवीचे कुलपती राहिले आहेत. शिवाय, बीएन शुक्ला हे रशियात भारताचे राजदूतही होते.

मोदींचा अर्ज भरण्यासाठी प्रस्तावक म्हणून अन्नपूर्णा शुक्ला यांच्यासह एकूण चार जण होते. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील चौघांचा समावेश आहे. अन्नपूर्णा शुक्ला, डोमराज कुटुंबातील जगदीश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गुप्ता आणि कृषी शास्त्रज्ञ राम शंकर पटेलयांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी सकाळी 11.45 वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाराणसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी एनडीएममधील सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. मोदींनी सर्वात आधी एनडीएतील सर्वात ज्येष्ठ नेते आणि अकाली दलाचे प्रमुख प्रकाश सिंह बादल यांच्या पाया पडले. त्यानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दिला. त्याआधी मोदींनी अनपूर्णा शुक्ला यांच्याही पाया पडले. अर्ज भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 45 मिनिट जिल्हाधिकारी कार्यालयात होते.