AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?

नवी दिल्ली : निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या वेगवेगळ्या नेत्यांच्या अथवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर पडणाऱ्या आयकर छाप्यांची चर्चा सुरु आहे. त्यातूनच कोणत्या मुख्यमंत्र्याची संपत्ती किती? हाही अनेकांच्या जिज्ञासेचा विषय ठरत आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवर छापे पडल्यानंतर त्यांच्याही संपत्तीबाबत चर्चेला उधाण आले आहे. ते स्वतः एक उद्योगपती आहेत. त्यांचा मुलगा नकुलनाथ याच्या […]

देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

नवी दिल्ली : निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या वेगवेगळ्या नेत्यांच्या अथवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर पडणाऱ्या आयकर छाप्यांची चर्चा सुरु आहे. त्यातूनच कोणत्या मुख्यमंत्र्याची संपत्ती किती? हाही अनेकांच्या जिज्ञासेचा विषय ठरत आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवर छापे पडल्यानंतर त्यांच्याही संपत्तीबाबत चर्चेला उधाण आले आहे. ते स्वतः एक उद्योगपती आहेत. त्यांचा मुलगा नकुलनाथ याच्या नावावरही 6 अरब म्हणजेच 660 कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे स्वतः कमलनाथ यांच्याकडे किती संपत्ती आहे याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. त्याअनुषंगाने देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री खालीलप्रमाणे,

सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत 5व्या क्रमांकावर आहेत तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री आणि आता दुसऱ्यांदा निवडून आलेले के. चंद्रशेखर राव (केसीआर). तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख केसीआर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे. त्याप्रमाणे त्यांच्याकडे 15.51 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

केसीआर यांच्यापेक्षा अधिक संपत्तीसह पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग चौथ्या क्रमांकावर आहेत. अमरिंदर सिंग यांनी 48.31 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या या संपत्तीत 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर 42 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

मध्यप्रदेशमध्ये आयकर छाप्यानंतर ज्या मुख्यमंत्र्यांच्या श्रीमंतीची चर्चा सध्या सुरु आहे, ते कमलनाथ श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कमलनाथ यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण 124.67 कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्याकडे अँबेसेडर क्लासिक आणि सफारी स्टॉर्म एसयूव्ही कारही आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावरही 33.50 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 15.79 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असे नाव आहे ज्याची श्रीमंतीसाठी तशी फारशी चर्चा झालेली नाही. ते नाव आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते पेमा खांडू. त्यांच्याकडे 129.57 कोटींची संपत्ती आहे. त्यात 103 कोटींची जंगम आणि 26 कोटींची स्थावर संपत्ती आहे.

देशातील सर्वाधित श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख नायडू यांच्याकडे एकूण 177.48 कोटींची संपत्ती आहे. ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’च्या वर्ष 2018 च्या अहवालानुसार प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार चंद्रबाबू नायडू यांच्याकडे 134.80 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता 42.68 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

पाहा व्हिडीओ:

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...