वानखेडेंच्या मागे हात धुवून लागलेल्या नवाब मलिक यांच्या दुबई दौऱ्याचं कारण काय?

| Updated on: Nov 22, 2021 | 2:56 PM

याआधी, कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला होता

वानखेडेंच्या मागे हात धुवून लागलेल्या नवाब मलिक यांच्या दुबई दौऱ्याचं कारण काय?
Nawab Malik at Dubai Expo
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान संबंधित ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पाठीमागे हात धुवून लागलेले, भाजप सरकारला जोरदार प्रत्युत्तर देणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला लढवणारे अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) सध्या दुबई दौऱ्यावर आहेत. मात्र मलिक अचानक दुबईला का गेले, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. वानखेडेंविरोधातील कुठले पुरावे गोळा करण्यासाठी मलिकांनी दुबई गाठली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण अनेक वेळा मलिक यांच्या आरोपांचे दुबई कनेक्शन आढळले आहे.

नवाब मलिक यांचा दुबई दौरा

“सर्वांना नमस्कार, मला तुम्हा सर्वांना कळवण्यात आनंद होतो आहे की, मी आपले केंद्र आणि राज्य सरकार या दोघांच्याही आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन दुबईला जात आहे. मी 24 नोव्हेंबर 2021 रोजी भारतात परत येईन. सर्व सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे आणि माझ्या हालचालींचा मागोवा घ्यावा ही विनंती” असे ट्वीट मलिक यांनी दुबईला निघण्यापूर्वी केले होते.

दुबई एक्स्पो 2020 मध्ये हजेरी

दोन दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी आणखी काही फोटो शेअर केले. “मी दुबई एक्स्पो 2020 मध्ये इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र एक जागतिक आर्थिक केंद्र म्हणून आपली अमर्याद व्यावसायिक क्षमता आणि संधींचं दर्शन घडवत असल्याचे पाहणे खूप आनंददायी होते” असे मलिक यांनी फोटोसोबत लिहिले आहे.

“एक्सपो 2020 दुबई येथे यूके पॅव्हेलियनला भेट दिली. देशाच्या वारसा आणि संधींवरील देशाच्या भविष्याची आणि महत्त्वाकांक्षेची झलक पाहिली” असंही त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वानखेडेंच्या कुटुंबाच्या दुबई ट्रीपवर सवाल

याआधी, कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले होते.

व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

वानखेडेंवर ट्विटरबॉम्ब

समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक सातत्याने करत आहेत. त्यासंदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. आज पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम धर्मगुरुंच्या समोर सही करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

समीर वानखेडे, जास्मीन वानखेडे यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मलिक दुबई दौऱ्यावर; अतिशय खोचक ट्वीट करून माहिती, ते का म्हणतायत सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे?

‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’; मलिक यांचा दुबईतून मध्यरात्री ‘फोटोबॉम्ब’