निकालाआधीच विकिपीडिया अपडेट, राजस्थानचा मुख्यमंत्रीही ठरवला!

मुंबई : राजस्थानमध्ये काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. काँग्रेसच राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करेल, हे एव्हाना निश्चित झाले आहे. त्यामुळे अर्थात राजस्थानात काँग्रेसच्या सरकारचं नेतृत्त्व कोण करेल, मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड होईल, याची चर्चा आता सुरु झाली आहे. या चर्चेचं उत्तर काँग्रेसच्या हायकमांडकडून येण्याआधीच, विकिपीडियाने दिले आहे. विकिपीडियाच्या ‘List of Chief Mnisters of Rajsthan’ या पेजवर राजस्थानचे …

निकालाआधीच विकिपीडिया अपडेट, राजस्थानचा मुख्यमंत्रीही ठरवला!

मुंबई : राजस्थानमध्ये काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. काँग्रेसच राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करेल, हे एव्हाना निश्चित झाले आहे. त्यामुळे अर्थात राजस्थानात काँग्रेसच्या सरकारचं नेतृत्त्व कोण करेल, मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड होईल, याची चर्चा आता सुरु झाली आहे. या चर्चेचं उत्तर काँग्रेसच्या हायकमांडकडून येण्याआधीच, विकिपीडियाने दिले आहे.

विकिपीडियाच्या ‘List of Chief Mnisters of Rajsthan’ या पेजवर राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे राजस्थानातील तरुण नेते सचिन पायलट यांचं नाव प्रकाशित केले. विशेष म्हणजे, ’13 डिसेंबर 2018′ पासून पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री असतील, हेही या पेजवर प्रकाशित करण्यात आले होते.

दरम्यान, सोशल मीडियावर विकिपीडियाच्या पेजचा स्क्रीनशॉट फिरु लागल्यानंतर, विकिपीडियाने पेजवरुन सचिन पायलट यांचे नाव हटवले आणि राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अद्याप रिकामी असल्याचे म्हटले आहे. मात्र, सोशल मीडियावरुन राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांच्या नावाचं स्वागत केले जाते आहे.

राजस्थानात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी दोन दावेदार मुख्य मानले जात आहेत. त्यात पहिले अर्थात माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि दुसरे दावेदार आहेत राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि तरुण नेते सचिन पायलट. आता दोघांमधील कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *