या निवडणुकीतही ईव्हीएमवर आरोप होणार का?

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून देशातील प्रत्येक निवडणुकीत भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचे आरोप केलेत. निवडणूक आयोगाने या आरोपांचं वारंवार खंडन केलं, पण राजकीय पक्षांकडून आरोप हे सातत्याने करण्यात आले. आता पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकीत तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार येताना दिसतंय. त्यामुळे या निवडणुकीतही ईव्हीएमचे आरोप होणार का, असा प्रश्न …

या निवडणुकीतही ईव्हीएमवर आरोप होणार का?

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून देशातील प्रत्येक निवडणुकीत भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचे आरोप केलेत. निवडणूक आयोगाने या आरोपांचं वारंवार खंडन केलं, पण राजकीय पक्षांकडून आरोप हे सातत्याने करण्यात आले. आता पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकीत तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार येताना दिसतंय. त्यामुळे या निवडणुकीतही ईव्हीएमचे आरोप होणार का, असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केला जातोय.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यांच्या निवडणुकात अनेकदा ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर मतदान झाल्यापासून स्ट्राँग रुमबाहेर पहारा दिला होता. मतमोजणीच्या क्षणापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांची यावर नजर होती.

काँग्रेसने या पाच राज्यांच्या निवडणुकांमधून जबरदस्त कमबॅक केलंय. पण नुकत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच्या सर्वपक्षीय बैठकीतही विरोधी पक्षांनी ईव्हीएमशी छेडछाडीचा आरोप केला होता. अनेक पक्षांनी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

10 डिसेंबर रोजी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी ईव्हीएमच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. भाजपकडून ईव्हीएमचा गैरवापर केला जातोय असं ते म्हणाले होते. एवढंच नाही, तर गुजरात आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतरही भाजपने ईव्हीएममध्ये घोळ करुन निवडणूक जिंकल्याचा दावा करण्यात आला होता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अगोदर भाजपने मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर तातडीने काँग्रेसकडून ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आला. पण नंतर भाजप पिछाडीवर गेल्यानंतर काँग्रेसनेच आघाडी घेतली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *