कोल्हापूरचा नाद खुळा, निवडणुकीआधीच गुलाल उधळा

महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या आणि आपल्या भागात अपेक्षित आरक्षण मिळालेल्या काही इच्छुकांनी आजच गुलालाची उधळण करत आपला आनंद व्यक्त केला.

कोल्हापूरचा नाद खुळा, निवडणुकीआधीच गुलाल उधळा
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 6:59 PM

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत आज (21 डिसेंबर) पार पडली. महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या आणि आपल्या भागात अपेक्षित आरक्षण मिळालेल्या काही इच्छुकांनी आजच गुलालाची उधळण करत आपला आनंद व्यक्त केला. निवडणुकीआधी इच्छुकांनी केलेल्या या विजय उत्सवाची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान लॉटरी पद्धतीने पार पडलेल्या या आरक्षणात अनेक दिग्गजांच्या प्रभागातील आरक्षण बदलल्यानं त्यांची निराशा झालीय. अशा दिग्गजांना आता शेजारील प्रभागाचा आधार घ्यावा लागणार आहे (Willing Candidate for Kolhapur Municipal Corporation celebrate before Election).

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत उमेदवारी करु इच्छिणाऱ्यांचे सर्वाधिक लक्ष लागून राहिलेला प्रभाग आरक्षण सोडतीचा टप्पा आज पार पडला. केशवराव भोसले नाट्यगृहात आज 81 प्रभागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. आजच्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी 11 प्रभाग आरक्षित करण्यात आले. 6 प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जमातीसाठी कोणताही प्रभाग आरक्षित करण्यात आलेला नाही. तो निरंक ठेवण्यात आलेला आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 22 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहे. त्यामध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी 11 प्रभाग आरक्षित करण्यात आले. सर्वसाधारण म्हणजेच खुल्या वर्गातील पुरुषांसाठीसाठी 24 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने सर्वसाधारण महिला खुल्या वर्गासाठी 24 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत.

कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली असली तरी गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून इच्छुकांनी आपली तयारी सुरू केलीय. यातील अनेक इच्छूक आज सोडत प्रक्रियेवेळी उपस्थित होते. सोडतीनंतर या इच्छुकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ असं वातावरण पाहायला मिळालं. विशेषतः अपेक्षित आरक्षण जाहीर होताच इच्छुकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. उत्साहाच्या भरात त्यांनी गुलालाची उधळण करत आपला आनंदही व्यक्त केलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच इतकं उत्साहाचं वातावरण असेल, तर निवडणूक रंगात आल्यानंतर हे राजकीय वातावरण आणखी तापणार असल्याचं दिसतंय.

हेही वाचा :

कोल्हापुरात नवा पक्ष, ‘आमचं ठरलंय’ला मान्यता देण्याचं निवडणूक आयोगानेही ठरवलं

Willing Candidate for Kolhapur Municipal Corporation celebrate before Election

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.