पुण्यात भाजपच्या नगरसेविकेची मध्यरात्री महिला डॉक्टरला मारहाण

पुणे : पुणे महापालिकेतील भाजपच्या नगरसेविकेने ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मध्यरात्री मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी  मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवा विभागात घडली. डॉ. स्नेहल अशोक खंडागळे यांनी तक्रार दिली […]

पुण्यात भाजपच्या नगरसेविकेची मध्यरात्री महिला डॉक्टरला मारहाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

पुणे : पुणे महापालिकेतील भाजपच्या नगरसेविकेने ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मध्यरात्री मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी  मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवा विभागात घडली. डॉ. स्नेहल अशोक खंडागळे यांनी तक्रार दिली आहे.

नेमकं काय घडलं?

डॉ. स्नेहल खंडागळे या मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास एका गंभीर रुग्णावर उपचार करीत होत्या. त्याचवेळी नगरसेविका आरती कोंढरे या त्याठिकाणी आल्या आणि तेथील कॉटवर असलेल्या रुग्णाविषयी विचारणा करू लागल्या. मोठ्याने आवाज करून “येथे कोण डॉक्टर आहेत  या पेशंटकडे कोण पाहतय?” अशी विचारणा करीत आरडाओरड करू लागल्या.

डॉ. स्नेहल तिथे आल्या असता आरती कोंढरे यांनी या पेशंटवर त्वरित उपचार करण्यास त्यांना सांगितले. त्यावर डॉ. स्नेहल यांनी सदरच्या पेशंटवर प्राथमिक उपचार करून त्याच्या डोक्याला टाके टाकल्याचे तसेच त्याला सिटी स्कॅन करण्यासाठी पाठवायचे असल्याचे कोंढरे यांना सांगितले. परंतु, कोंढरे यांनी मोठमोठ्याने ओरडून पेशंटला लवकर घेऊन जाण्यास सांगितले.

डॉ. स्नेहल यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता. आरती कोंढरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. तसेच मोबाइलवर शूटिंग करण्यास सुरुवात केली. डॉ. स्नेहल यांनी त्यांना मनाई करून मोबाइलवर हात आडवा धरून शुटींग रोखण्याचा प्रयत्न केला असता आरती कोंढरे यांनी डॉ. स्नेहल यांच्या गालावर हाताने मारले. त्याचवेळी आरती कोंढरे यांच्यासोबत असलेल्या सचिन कोंढरे यांनी त्यांना समजावून सांगून तेथून बाहेर नेले. या प्रकरणी नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस तपास  करीत आहेत.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.