Eknath Shinde : विश्वासमत जिंकले, आता जनतेची मने जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ‘असा’ असेल पहिला दिवस

मुख्यमंत्री यांच्यासाठी अधिवेशनाचा दुसरा दिवस महत्वाचा राहणार आहे. याच दिवशी त्यांना बहुमत सिध्द करावे लागणार आहे. सत्ता स्थापनेची सर्व गणिते जुळल्यानंतर आता बहुमत सिध्द करणे ही एक औपचारिकता होती. बहुमत स्पष्ट झाल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघाच्या परंपरेनुसार विधानभवन प्रेस रूम मध्ये पत्रकार परिषदेला सामोरे जातील.

Eknath Shinde : विश्वासमत जिंकले, आता जनतेची मने जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा 'असा' असेल पहिला दिवस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 11:51 AM

मुंबई :  (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अधिवेशनाचा दुसरा दिवस महत्वाचा आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना (Majority Test) बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार असले तरी ती एक औपचारिकता राहणार आहे. शिंदे गटाला मान्यता मिळाल्यानंतर हे बहुमताचे गणित अधिक सोपे झाले आहे. मात्र, (Assembly) विधानसभेत विश्वासमत स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री यांचा पहिला दिवस कसा असणार हे देखील तेवढच महत्वाचे राहणार आहे. पहिल्याच दिवशी त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या अनुशंगाने महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. दिवसभराच्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये दोन बाबी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन आणि ठाणे आणि मुंबई जिल्ह्याची सीमा धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर होणारे त्यांचे स्वागत.

बहुमत सिध्द झाल्यावर पत्रकारांशी संवाद

मुख्यमंत्री यांच्यासाठी अधिवेशनाचा दुसरा दिवस महत्वाचा राहणार आहे. याच दिवशी त्यांना बहुमत सिध्द करावे लागणार आहे. सत्ता स्थापनेची सर्व गणिते जुळल्यानंतर आता बहुमत सिध्द करणे ही एक औपचारिकता होती. बहुमत स्पष्ट झाल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघाच्या परंपरेनुसार विधानभवन प्रेस रूम मध्ये पत्रकार परिषदेला सामोरे जातील.त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील.

दिवसभर अभिवादन अन् स्वागत कार्यक्रम

* हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील.

हे सुद्धा वाचा

* छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील ( शिवाजी पार्क मधील) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जातील.

* चैत्यभुमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत.

* ठाणे आणि मुंबई जिल्ह्याची सीमा धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभूतपूर्व जल्लोषात ठाणे नगरीत स्वागत करण्यात येईल.

* गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचे दर्शन घेतील.

* टेम्भी नाका येथील आनंदाश्रम येथे भेट देणार तसेच समोरील पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.

राजकीय नाट्यानंतर प्रथमच निवासस्थानी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय नाट्यानंतर ते थेट मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर प्रथमच ते त्यांच्या लुईसवाडी येथील ‘शुभ-दिप’ या निवास्थानी जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून घरापासून दूर राहिलेले शिंदे आज घरी परतणार आहेत. तर ठाणे शहरातील समस्त शिवसैनिक आणि नागरिकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.