AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir | ‘त्या ठिकाणी मंदिर बांधण्याला आमच समर्थन नाही’, एका मोठ्या राजकीय पक्षाची भूमिका

Ram Mandir | देशात एकाबाजूला राम मंदिर उद्घाटनाची उत्सुक्ता आहे. त्याचवेळी राजकारण देखील जोरात सुरु आहे. देशातील वातावरण राममय, भक्तीमय झालेलं आहे. पण वेगवेगळे राजकीय पक्ष देखील आपली भूमिका मांडत आहे. काही राजकीय पक्ष 22 जानेवारी या दिवशी अयोध्येला जाणार नाहीयत.

Ram Mandir | 'त्या ठिकाणी मंदिर बांधण्याला आमच समर्थन नाही', एका मोठ्या राजकीय पक्षाची भूमिका
अयोध्येतील राम मंदिर
| Updated on: Jan 19, 2024 | 10:46 AM
Share

Ram Mandir | देशात एकाबाजूला राम मंदिर उद्घाटनाची जय्यत तयारी सुरु आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. प्रत्येक राम भक्ताला अयोध्येतील या सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा आहे. पण ते शक्य नाहीय. त्यामुळे स्थानिक पातळीवर या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. एकाबाजूला उद्घाटनाची तयारी सुरु आहे. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला या मुद्यावरुन राजकारणही सुरु झाल आहे. काही राजकीय पक्ष या दिवशी अयोध्येला जाणार नाहीयत. त्यांनी हा भाजपा, RSS चा कार्यक्रम असल्याच म्हटलं आहे. त्याऐवजी विरोधी पक्षाचे नेते दुसऱ्या मंदिरात पूजा अर्चा करणार आहेत. केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी या दिवशी सुट्टीची घोषणा केली आहे. त्यावरही काही राजकीय नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.

आता तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी या मुद्यावर वक्तव्य केलं आहे. त्यांनी अयोध्या राम मंदिर मुद्यावर डीएमकेची भूमिका स्पष्ट केली. “द्रमुक धर्माच्या विरोधात नाहीय. आम्ही कुठल्याही मंदिर निर्माणाच्या विरोधात नाहीय” असं उदयनिधी स्टालिन यांनी म्हटलं आहे. डीएमकेला नास्तिक सिद्धांत असलेला पक्ष मानला जातो.

धर्म आणि राजकारणाबद्दल काय म्हटलं?

“धर्म आणि राजकारणाला एकत्र करु नका, असं आमच्या नेत्याने सांगितलं होतं. आम्ही कुठल्याही मंदिर निर्माणाच्या विरोधात नाहीय. पण ज्या ठिकाणी मशीद पाडण्यात आली, त्या ठिकाणी मंदिर निर्माणाच आम्ही समर्थन करत नाही” असं उदयनिधी स्टालिन म्हणाले. तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख विरोधी पक्ष अण्णाद्रमुकवर त्यांनी टीका केली. राम जन्मभूमी मंदिर आंदोलनाच्यावेळी अण्णाद्रमुकने अयोध्येत कारसेवक पाठवले होते, असं उदयनिधी स्टालिन म्हणाले.

गर्भगृहात रामललाची मुर्ती स्थापित

अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची मुर्ती स्थापित करण्यात आली आहे. पाच वर्षीय रामाची 51 इंच ऊंचीची काळ्या दगडाची मुर्ती चार तासाच अनुष्ठान आणि मंत्रोच्चारानंतर स्थापित करण्यात आली. 22 जानेवारीला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याआधी सतत अनुष्ठान आयोजित करण्यात येत आहेत.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.