Yogesh Kadam : शिवसेनेचं खच्चीकरण आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवण्याची काही नेत्यांची छुपी नीती, योगेश कदम यांचा गंभीर आरोप

शिवसेना आमदार योगेश कदम यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर पक्षाला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधताना मनातील सल बोलून दाखवली आहे.

Yogesh Kadam : शिवसेनेचं खच्चीकरण आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवण्याची काही नेत्यांची छुपी नीती, योगेश कदम यांचा गंभीर आरोप
योगेश कदम (फेसबुक)
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 9:31 AM

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली (Dapoli) आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेनं परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर दिली होती. दापोलीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला आहे. मात्र, तिथं राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्यात. तर, मंडणगडमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमदेवार पराभूत झाले असून शिवसेना बंडखोर उमेदवारांचं शहर विकास पॅनेलचे उमदेवार विजयी झाले आहेत. मंडणगडमधील सत्तेच्या चाव्या आता अपक्ष उमदेवांरांच्या हाती गेल्या आहेत. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर पक्षाला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना आमदार योगेश कदम (Yogesh Kadam ) यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधताना मनातील सल बोलून दाखवली आहे. शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती, असा गंभीर आरोप योगेश कदम यांनी केला आहे.

आम्ही या निवडणुकीपासून अलिप्त होतो

सेना आमदार योगेश कदम यांनी ते आणि त्यांचे वडिल रामदास कदम नगरपंचायत निवडणुकीपासून अलिप्त होतो, असं म्हटलंय. योगेश कदम यांनी शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ वाढवायचं ही नीती दापोलीमध्ये यशस्वी झाली, असं योगेश कदम म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्याच्या निर्णयाचा फायदा राष्ट्रवादीचा झाला, शिवसेनेचा झालेला नाही, असंही ते म्हणाले. अपक्षांना मिळालेल्या मतांवरून, दापोलीतील शिवसैनिक जागेवरच आहे हे सिद्ध झालं असल्याचेही योगेश कदम यांनी सांगितलं.

मंडणगडमध्ये शिवसैनिक नगराध्यक्ष होईल

मंडणगडमध्ये जे शिवसैनिक अपक्ष म्हणून उभे राहिले ते 7 जण निवडून आले. मंडणगडध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसेल हा विश्वास असल्याचं आमदार योगेश कदम म्हणाले.

मंडणगडमधील पक्षीय बलाबल

नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांपैकी 7 जण विजयी झाले आहेत. तर, राष्ट्रवादी शिवसेना महाआघाडीच्या 7 उमदेवारांचा विजय झाला. तर, 3 अपक्ष उमेदवार देखील विजयी झाले आहेत. मंडणगड नगरपंचायतीची सूत्र आता अपक्षांच्या हाती गेली आहेत.

इतर बातम्या:

School And Colleges Reopening | राज्यातील शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरु होणार ? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

U19 World Cup: भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, 12 चेंडूत 48 धावा तडकावणारा हरनूर ठरला हिरो

Yogesh Kadam slam some Shivsena Party leaders over Dapoli and Mandangad Nagar Panchayat Election Result

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.