तीन दिवसांसाठी का होईना अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास नाही का?; चंद्रकांतदादांचा टोला

राज्यात गेल्यावर्षी अजित पवार यांना हाताशी धरून भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज एक वर्ष पूर्ण झाले. | Chandrakant Patil

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 19:53 PM, 23 Nov 2020
you can not denied fact that last year Ajit Pawar leaves Sharad Pawar says Chandrakant Patil

सांगली: सध्या अजित पवार (Ajit Pawar) त्यांचे काका शरद पवार यांच्याबद्दल गोडवे गात आहेत. मात्र, गेल्यावर्षी तीन दिवसांसाठी का होईना, त्यांनी काकांना सोडले होते, हा इतिहास विसरुन कसा चालेल, असा बोचरा सवाल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विचारला. (BJP Chandrakant Patil take  a dig at NCP leaders over last year oath taking ceremony)

राज्यात गेल्यावर्षी अजित पवार यांना हाताशी धरून भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील नेत्यांनी या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजप नेत्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात प्रत्युत्तर दिले. आता कितीही गोडवे गायले तरी गेल्यावर्षी तीन दिवसांसाठी अजितदादांनी काकांना सोडले होते, हा इतिहास आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करायची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांपेक्षा सुप्रिया सुळे यांना प्राधान्य देतील, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस ही दरबारी लोकांची पार्टी आहे. भाजप हा सामान्य माणसाचा पक्ष आहे. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी मी कोथरूडला अडकलो होतो. त्यामुळे इस्लामपुरात पुरेसे लक्ष देता आले नाही. आमच्यात मतभेद नसते तर इस्लामपूरात जयंत पाटील यांची सुट्टी केली असती. मग ते राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते. आता आगामी निवडणुकीत पाहूच, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

‘आम्ही फडणवीसांना टरबुज्या म्हणत नाही, चंपा म्हटल्यावर चंद्रकांत पाटलांनी राग मानू नये’

देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी कधी टरबुज्या म्हणत नाही. चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यांनी राग मानून घेऊ नये, असा टिपणी जयंत पाटलांनी केली. अशाप्रकारे कोणाचाही अपमान करण्याला राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन देत नाही. शरद पवार यांनी आम्हाला अशा गोष्टी शिकवल्या नाहीत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

‘त्या’ अनुभवानंतर आता राज्यपाल पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांचा टोला

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस-अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला 1 वर्ष पूर्ण!, ते सरकार अल्पजीवी का ठरलं?

(BJP Chandrakant Patil take  a dig at NCP leaders over last year oath taking ceremony)