प्रिस्क्रिप्शन पॅडवरुन मतदानासाठी आवाहन, ‘झेन’ हॉस्पिटलचं स्तुत्य अभियान

मुंबई : मतदान हा प्रत्येक सुजान भारतीय नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. आपल्या अधिकाराची महत्व हे आपल्याला मिळालेल्या नागरीकत्वाचा अविभाज्य घटक आहे. बऱ्याचदा अनेक लोक मतदान करत नाहीत. आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे, असा समज करुन ते मतदान प्रक्रियेपासून दूर राहतात. पंरतु, तुमचे एक मतही तितकेच बहुमूल्य आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्येकाने हा […]

प्रिस्क्रिप्शन पॅडवरुन मतदानासाठी आवाहन, ‘झेन’ हॉस्पिटलचं स्तुत्य अभियान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : मतदान हा प्रत्येक सुजान भारतीय नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. आपल्या अधिकाराची महत्व हे आपल्याला मिळालेल्या नागरीकत्वाचा अविभाज्य घटक आहे. बऱ्याचदा अनेक लोक मतदान करत नाहीत. आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे, असा समज करुन ते मतदान प्रक्रियेपासून दूर राहतात. पंरतु, तुमचे एक मतही तितकेच बहुमूल्य आहे. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्येकाने हा अधिकार बजावणे गरजेचे आहे, म्हणूनच चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयातर्फे मदतान जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत डाँक्टर्स, नर्सेस, रूग्णालयातील सर्व कर्मचारी सहभागी होऊन नागरीकांना मतदानाचे आवाहन करणार आहे.

“सदृढ राष्ट्रासाठी, मतदान करा” (#VoteForHealthyNation) हा संदेश प्रिस्क्रीप्शनच्या चिटवर लिहत अनोखी मोहिम राबवत प्रत्येक घराघरात पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. सोमवारपासून म्हणजे २२ एप्रिलपासून या मोहिमेस सुरूवात होणार आहे.

तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाच महत्व विशद करणारे संदेश, डॉक्टरांचे मतदानाविषयी आवाहन करणारे व्हिडीओ जास्तीतजास्त नागरीकांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच, रुग्णालयाच्या रुग्ण बाह्य विभागात एका बूथच्या माध्यमातून रुग्णालयातील कर्मचारी स्वंयसेवक बनून मतदानाच महत्व नागरिक, रुग्णांना सांगतील.

या मोहिमेविषयी बोलताना झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर म्हणाले की, “भारत ही जगातील सर्वात मोठे लोकशाही असणारा देश आहे. या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाला जो अधिकार मिळाला आहे तो प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. आपला अधिकार बजावून मतदानाचा टक्का वाढविणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी असून तुम्हाला अपेक्षित असलेला बदल घडविण्यासाठी तसेच देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी या प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे.”

तसेच, “जसे रुग्णाला औषधोपचार आवश्यक आहे. तसेच लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. चला तर आपल्यासह इतरांनाही लोकशाहीच्या उत्सवात सहभागी करून घेऊ या, मतदान करूया, सदृढ राष्ट्र घडवू या.”, असेही आवाहन डॉ. रॉय पाटणकर यांनी केले.

महाराष्ट्रात उरले दोन टप्पे!

महाराष्ट्रत पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) 7 जागांसाठी मतदान, दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) 10 जागांसाठी मतदान पार पडलं. तर तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) 14 जागांसाठी, तर चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) 17 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. विशेष म्हणजे, 29 एप्रिल रोजी मुंबईतल्या सर्व लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडेल. या पार्श्वभूमीवर झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.