Corona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले

मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचे नवीन 5 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या आता 77 वर येऊन पोहोचली आहे.

Corona : पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 77 वर, नवे 5 रुग्ण सापडले

पुणे : राज्यात कोरोनाचा गुणाकार दिवसेंदिवस (Corona Patients Update In Pune) वाढतच चालला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाचे नवीन 5 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या आता 77 वर येऊन पोहोचली आहे. पुणे विभागातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे पुण्यात आहेत. पुण्यात कोरोनाबाधित 36 रुग्ण आहेत. तर पिंपरी चिंचवड 12, सातारा 2,सांगली 25 आणि (Corona Patients Update In Pune) कोल्हापूर 2 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुणे विभागातून आतापर्यंत 1633 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 1,529 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 104 चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1,413 नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर 77 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

पुण्यात दोन महिला कोरोनामुक्त

पुण्यातील पहिल्या ‘कोरोना’ रुग्णाच्या मृत्यूनंतर पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली. पुण्यातील दोन कोरोनाग्रस्त महिला ‘कोरोना’मुक्त झाल्या आहेत. महिलांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. यापैकी एक महिला नायडू रुग्णालयात, तर दुसरी खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. खाजगी रुग्णालयातील महिला अत्यवस्थ होती, मात्र उपचारानंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दोन्ही कोरोनामुक्त महिलांना आज (बुधवार 1 एप्रिल) डिस्चार्ज दिला जाणार आहे.

डिस्चार्ज दिल्यानंतर दोन्ही महिलांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवलं जाणार आहे. पुण्यात आतापर्यंत नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा 30 मार्चला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता (Corona Patients Update In Pune). या रुग्णावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्यानंतर पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली होती.

पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 38 रुग्ण होते, त्यातील 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड परिसरातही 11 मार्चपासून तब्बल 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील 9 जण उपचारानंतर घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 167
पुणे – 36
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर – 16
कल्याण – 9
नवी मुंबई – 8
अहमदनगर – 8
ठाणे – 9
वसई विरार – 6
यवतमाळ – 4
बुलडाणा – 3
पनवेल – 2
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
उल्हासनगर – 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 318

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 1 एप्रिल
पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

Corona Patients Update In Pune

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई369323741173
पुणे (शहर+ग्रामीण)6507938294
पिंपरी चिंचवड मनपा389347
ठाणे (शहर+ग्रामीण)
39863678
नवी मुंबई मनपा24618050
कल्याण डोंबिवली मनपा11919119
उल्हासनगर मनपा2676
भिवंडी निजामपूर मनपा108116
मिरा भाईंदर मनपा62515713
पालघर 13713
वसई विरार मनपा77610520
रायगड553515
पनवेल मनपा44614
नाशिक (शहर +ग्रामीण)33828
मालेगाव मनपा73252
अहमदनगर (शहर+ग्रामीण)96366
धुळे13516
जळगाव 555169
नंदूरबार 333
सोलापूर7694162
सातारा459316
कोल्हापूर 37924
सांगली104291
सिंधुदुर्ग2120
रत्नागिरी21625
औरंगाबाद14101465
जालना1170
हिंगोली 14310
परभणी421
लातूर 10883
उस्मानाबाद 6430
बीड460
नांदेड 1086
अकोला 5371428
अमरावती 20216
यवतमाळ 128220
बुलडाणा 5683
वाशिम 80
नागपूर511849
वर्धा 1101
भंडारा2500
गोंदिया 5810
चंद्रपूर25‬10
गडचिरोली3100
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)56013
एकूण62228269972098
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *