खळबळजनक! सुनेच्या कौमार्य चाचणीला पुण्यातील माजी नगरसेवकाची मान्यता

पुणे : कांजरभाट समाजातील लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्य चाचणी घेण्याची अनिष्ट प्रथा किती खोल रुजली आहे, याचं धक्कादायक उदाहरण शिक्षणाचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, पुण्यातील माजी नगरसेवकाने आपल्या उच्चशिक्षित सुनेला कौमार्य परीक्षा देण्यास मान्यता दिली आहे. तसेच, कौमार्य चाचणी पार पडल्याचेही अंधश्रद्ध निर्मुलन समितीने दावा करुन त्यांच्यावर करवाईची मागणी …

खळबळजनक! सुनेच्या कौमार्य चाचणीला पुण्यातील माजी नगरसेवकाची मान्यता

पुणे : कांजरभाट समाजातील लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीची कौमार्य चाचणी घेण्याची अनिष्ट प्रथा किती खोल रुजली आहे, याचं धक्कादायक उदाहरण शिक्षणाचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यात समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, पुण्यातील माजी नगरसेवकाने आपल्या उच्चशिक्षित सुनेला कौमार्य परीक्षा देण्यास मान्यता दिली आहे. तसेच, कौमार्य चाचणी पार पडल्याचेही अंधश्रद्ध निर्मुलन समितीने दावा करुन त्यांच्यावर करवाईची मागणी केली आहे. कांजरभाट समाजाच्या बैठकीचं स्टिंग ऑपरेशन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केले आहे.

उद्योगपती असलेल्या पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलाचं 30 डिसेंबर 2018 रोजी कोरेगाव पार्क येथील लॉनवर लग्नसोहळा पार पडला. कांजरभाट समाजाच्या अनिष्ट प्रथेनुसार लग्नानंतर पहिल्या रात्री वधूची कौमार्य चाचणी घेतली जाते. या अनिष्ट प्रथेला माजी नगरसेवकानेही सहमती दर्शवली. त्यानुसार, मुलाने सुनेची कौमार्य चाचणी घेतली. त्यानंतर झालेल्या समाजाच्या बैठकीत यासंदर्भात प्रथेनुसार सांगण्यात आले. या बैठकीचं स्टिंग ऑपरेशन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केलं.

विशेष म्हणजे, माजी नगरसेवकाचा मुलगा आणि सून दोघेही इंग्लंडमध्ये शिकलेले आहेत. अत्यंत उच्चशिक्षित असतानाही, मुलाच्या वडिलांनी म्हणजे माजी नगरसेवकाने या कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट प्रथेला विरोध न करता, जात पंचायतीच्या दाबावाला बळी पडून सुनेची कौमार्य चाचणी घेतली.

धर्मदाय आयुक्तलयातील उपायुक्त कृष्णा इंद्रेकर यांनी वाचा फोडली. विशेष म्हणजे, त्यांनी लग्नासोहळ्यात माजी नगरसेवकाला विनंती केली होती की, कांजरभाट समाजाच्या या अनिष्ट प्रथेला खतपाणी न घालता, सुनेची कौमार्य चाचणी नाकारुन नवा पायंडा पाडावा. मात्र, माजी नगरसेवक जात पंचायतीच्या दबावाला बळी पडलेच.

आता माजी नगरसेवकासह कांजरभाट समाजाच्या या जात पंचायतीवर काय कारवाई पोलिस करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, समाजातील उच्चशिक्षित आणि नगरसेवक म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व केलेल्या व्यक्तीनेच आपल्या सुनेची कौमार्य चाचणी घेण्यास मान्यता दिल्याने अंनिससह विवेकी चळवळीतील लोकांनी संताप व्यक्त केला जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *