AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटलांना पाठिंब्यावरुन ब्राह्मण महासंघात फूट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर ब्राह्मण महासंघातच फूट (Partition in Brahman Mahasangh) पडल्याचं समोर आलं आहे.

चंद्रकांत पाटलांना पाठिंब्यावरुन ब्राह्मण महासंघात फूट
| Updated on: Oct 06, 2019 | 7:51 PM
Share

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर ब्राह्मण महासंघातच फूट (Partition in Brahman Mahasangh) पडल्याचं समोर आलं आहे. ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांनी एक पत्रक काढत (Brahman Mahasangh on Chandrakant Patil) चंद्रकांत पाटलांना महासंघाचा विरोध असल्याचं जाहीर केलं. मात्र, ब्राह्मण महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच परस्पर पाठिंब्याचं पत्रक काढणाऱ्या आनंद दवेंवर कारवाई करत त्यांना संघटनेतून हाकलण्यात येईल, असं म्हटलं.

ब्राह्मण महासंघाचे प्रवक्त आनंद दवे यांनी महासंघाने चंद्रकांत पाटलांना (Brahman Mahasangh Support Chandrakant Patil) पाठिंबा दिल्याचा दावा केला आहे. तसेच त्यासाठी एक पत्रकही सादर केले आहे. मात्र, ब्राह्मण महासंघाच्या संबंधित पत्रावर राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांची स्वाक्षरी नसल्याचंही स्पष्टपणे दिसत आहे. कुलकर्णी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

गोविंद कुलकर्णी म्हणाले, “चंद्रकांत पाटलांना पाठिंबा देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी रविवारी (6 ऑक्टोबर) बैठक घेणार आहेत. यात या मुद्द्यावर चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानुसारच महासंघाच्या उमेदवाराच्या अर्जावरही निर्णय घेतला जाईल. आनंद दवे यांनी राष्ट्रीय अध्यक्षांची परवानगी असल्याचं खोट बोलत पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांना संघटनेतून हकलण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष याबाबत लवकरच कारवाई करतील.”

दरम्यान, ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच ब्राह्मण समाजाच्यावतीने चंद्रकांत पाटलांपुढे 3 अटीही (Conditions of Brahman Mahasangh) ठेवण्यात आल्या होत्या.

ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटलांच्या विरोधात मयुरेश अरगडे यांना आपला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांकडून ब्राह्मण महासंघाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी त्यांनी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलण्यास सुरुवातही केली आहे. ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटलांपुढे 3 मुख्य अटी ठेवल्या आहेत.

1. परशुराम विकास महामंडळ तयार करावे 2. पौराहित्य करणाऱ्या पुरोहितांना मानधन दिले जावे 3. ब्राह्मण समाजाला अॅट्रोसिटी करण्याची परवानगी द्यावी

ब्राह्मण महासंघाच्या या मागण्यांवर चंद्रकांत पाटलांनी सावध भूमिका घेतली आहे. निवडणूक झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाच्या या मागण्यांवर विचार केला जाईल, असं आश्वासन चंद्रकांत पाटलांनी दिल्याचा दावा आनंद दवे यांनी केला. मात्र, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी असं कोणतंही आश्वासन मिळालं नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, “चंद्रकांत पाटलांनी केवळ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. निवडणूक असल्यानं ते काही करुही शकणार नाही.”

एकिकडे महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी चंद्रकात पाटलांनीच माघार घेण्याची भूमिका घेत आहेत. दुसरीकडे ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे चंद्रकांत पाटलांना पाठिंब्याचा दावा करत आहेत. यावरुन ब्राह्मण महासंघात फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. आता याबाबत ब्राह्मण महासंघाची काय भूमिका असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.