पुणेकरांना पेट्रोल-डिझेल मिळणार का? पुणे मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या परस्परविरोधी भूमिका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊनमध्ये कुणाला पेट्रोल-डिझेल मिळणार यावरुन पुणे मनपा आणि जिल्हा प्रशासनातच गोंधळ असल्याचं पाहायला मिळत आहे (PMC and District administration on Petrol Diesel in Pune).

पुणेकरांना पेट्रोल-डिझेल मिळणार का? पुणे मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या परस्परविरोधी भूमिका
Petrol Price May Come Down
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 1:20 AM

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊनमध्ये कुणाला पेट्रोल-डिझेल मिळणार यावरुन पुणे मनपा आणि जिल्हा प्रशासनातच गोंधळ असल्याचं पाहायला मिळत आहे (PMC and District administration on Petrol Diesel in Pune). आधी पुणे महानगरपालिका प्रशासनानं सामान्य नागरिकांना देखील पेट्रोल आणि डिझेल देण्याची भूमिका घेतली. मात्र आता जिल्हा प्रशासनानं इंधन केवळ अत्यावश्यक सेवा आणि प्रशासनानं परवानगी दिलेल्या वाहनांच मिळणार असल्याचे निर्देश दिलेत. त्यामुळं पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनात समन्वयाचा नसल्याचंच समोर आलं आहे. असं असलं तरी आता सामान्य पुणेकरांना इंधन मिळणार नाही हेच जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.

पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या निर्णयानंतर शहरात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा लागल्या होत्या. मात्र, इंधन भरण्यासाठी शहरात वाहनांची गर्दी वाढू लागली. यानंतर जिल्हा प्रशासनानं केवळ अत्यावश्यक सेवा आणि प्रशासनानं परवानगी दिलेल्या वाहनांनाच डिझेल आणि पेट्रोल मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. लॉकडाऊन काळात शासनाने परवानगी दिलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीत अत्यावश्यक आणि इतर वाहनांना देण्यात आलेले वाहतूक पास, सरकारी आणि निमसरकारी यंत्रणांनी दिलेले ओळखपत्र/पास ग्राह्य धरुन त्या वाहनांना इंधन पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा हद्द, पुणे, खडकी व देहूरोड छावणी परिषद हद्दीत कोणाला इंधन मिळेल हे स्पष्ट करण्यात आलं आहे. दोन्ही मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत याबाबत स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अत्यावश्यक आणि इतर सेवा सवलतीकरिता वाहनांना देण्यात आलेले वाहतूक पास, शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांनी दिलेले ओळखपत्र, पास ग्राह्य धरुन त्या वाहनांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवलकुमार राम यांनी दिले आहेत.

पुणे जिल्हयातील ग्रामीण भागात परवानगी देण्यात आलेल्या अत्यावश्यक व इतर औद्योगिक आस्थापनांमध्ये कोणत्याही पासेसशिवाय इंधन मिळणार आहे. शेती, बांधकाम आणि इतर सवलत मिळालेल्या क्षेत्रातील सर्व प्रकारच्या वाहनांना देखील इंधन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या क्षेत्रातील वाहनांना इंधनाला नकार दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुण्यात दिवसभरात पाच जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 2,201 वर

Corona Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजार 525 वर, दिवसभरात 841 नवे रुग्ण

Pune Corona : पुण्यात 24 तासात 99 नवे रुग्ण, 8 ते 10 दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची भीती

चाकणमध्ये 800 पेक्षा जास्त कंपन्या सज्ज, नियम-अटी पाळून काम सुरु करणार

PMC and District administration on Petrol Diesel in Pune

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.