पुण्यात पास मिळण्याच्या अफवेने रांगा, मूळगावी जाण्यासाठी भर उन्हात गर्दी

पुण्यात पास मिळण्याच्या अफवेने अनेक नागरिकांनी भर उन्हात मूळ गावी जाण्यासाठी तहसील कार्यालयासमोर रांगा (Pune Lockdown people Rush Tehsil Office) लावल्या आहेत.

पुण्यात पास मिळण्याच्या अफवेने रांगा, मूळगावी जाण्यासाठी भर उन्हात गर्दी
Follow us
| Updated on: May 02, 2020 | 4:02 PM

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आले (Pune Lockdown people Rush Tehsil Office) आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी परतण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. पुण्यात पास मिळण्याच्या अफवेने अनेक नागरिकांनी भर उन्हात मूळ गावी जाण्यासाठी तहसील कार्यालयासमोर रांगा लावल्या आहेत. यामुळे सोशल डिस्टंन्सिंग राखणे अवघड होत आहे.

पुण्यातील खडकमाळ तहसील कार्यालयासमोर आज (2 मे) दुपारी 12 च्या सुमारास (Pune Lockdown people Rush Tehsil Office) गावी जाणाऱ्या नागरिकांनी गर्दी केली. यातील अनेक जण हे तहसील कार्यालयात पास मिळणार असल्याच्या अफवेने जमा झाले आहे. यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

पुण्यात मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांना तहसील कार्यालयात माहिती सादर करण्यासाठीही अनेक लोक जमेल आहेत.

या ठिकाणी गडबड गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. नागरिक मोठ्या संख्येने जमा झालेले असल्याने सोशल डिस्टन्स राखणे हे मोठं आवाहन पाहायला मिळत आहे.

हेही वाचापुण्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा, घरी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात

लॉकडाऊनदरम्यान पुण्यात अडकलेल्या नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे. नागरिक ज्या तालुक्यांमध्ये अडकले आहेत त्या तालुक्याच्या तहसीलदारांची परवानगी घेऊन त्यांना आपापल्या गावी परत जाता येणार आहे. त्यासाठी तहसील कार्यालयातून नागरिकांना पासेस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना ऑनलाईन ई मेल करुनही आपापल्या गावी जाण्याची परवानगी घेता येणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काल (1 मे) दिली होती.

या नागरिकांची गावी जाण्याअगोदर वैद्यकीय तपासणी केली जाईल. वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांना आपल्या इच्छित स्थळी जाता येणार आहे. याशिवाय घरी परतल्यावर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. सध्या बाहेरुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे”, असे देखील विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी म्हटलं (Pune Lockdown people Rush Tehsil Office) होतं.

संबंधित बातम्या : 

मुंबई-पुण्यात अडकलेल्यांना गावी जाण्याची व्यवस्था होणार का? राजेश टोपे म्हणतात…

पुण्यात कोरोनाबळींचा आकडा 100 वर, एका पुरुषाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1828 वर, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.