AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त

आमदार अनिल भोसले यांच्या गाड्यांव्यतिरिक्त त्यांच्या किमती वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.

पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला दणका, आलिशान गाड्या जप्त
| Updated on: Sep 29, 2020 | 3:59 PM
Share

पुणे : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यावर (MLA Anil Bhosale House Seized) जप्तीची कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांच्या दोन आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी आमदार भोसलेंवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याबाबत भोसलेंच्या घरावर जप्ती आणण्यात आली आहे (MLA Anil Bhosale House Seized).

सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीला जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. आमदार अनिल भोसले यांच्या गाड्यांव्यतिरिक्त त्यांच्या किमती वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आणखी काही जणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात पुणे जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रसाशक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते (MLA Anil Bhosale House Seized).

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भोसले यांच्याबरोबरच तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. सुभाष देशमुख हे भोसले यांचे नातेवाईक असून त्यांनीच कारवाईला अडथळा केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

MLA Anil Bhosale House Seized

संबंधित बातम्या :

Pune PMPML | आधी लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण, आता प्रवाशांअभावी पीएमपीएमएल संकटात

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग, दोघा डॉक्टरांवर गुन्हा

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा सुटला, अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी 

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.