AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Wall Collapse : 8 बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. दरम्यान या प्रकरणी पुणे पोलिसांनी बिल्डर पंकज व्होरा आणि जगदीश अग्रवाल यांच्यासह 8 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

Pune Wall Collapse : 8 बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
| Updated on: Jun 29, 2019 | 4:39 PM
Share

पुणे : पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 12 मजुर तर तीन मुलांचा समावेश आहे. कोंढव्यातील तालाब मशीदीजवळील कंपनीसमोर ही दुर्घटना घडली. दरम्यान या प्रकरणी पुणे पोलिसांनी बिल्डर पंकज व्होरा आणि जगदीश अग्रवाल यांच्यासह 8 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान आज (29 जून) मध्यरात्रीच्या दीड दोनच्या सुमारास बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या मजुरांना राहण्यासाठी पत्र्याचे शेड उभे केले होते. या शेडवर इमारतीची भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. भिंत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं आणि अडकलेल्या काहींना वाचवलं. त्यानंतर त्यातील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन्ही बाजूच्या बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात आल्कन स्टायलस लॅंडमार्कस या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदार बिल्डर आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जगदीशप्रसाद अग्रवाल (64), सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (34), राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (27), विवेक सुनिल अग्रवाल (21), विपूल सुनील अग्रवाल (21) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. तसेच या बिल्डरचे साईट इंजिनिअर, सुपरवाईजर, कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याशिवाय कांचन डेव्हलपर्स या बांधकाम संस्थेच्या तीन भागीदार बिल्डरांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी अशी गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरांची नावे आहेत. तसेच याप्रकरणी या बिल्डरचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर आणि मजुर पुरवणारा कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या दुर्घटनेत मृत्यू झालेले मजूर हे कांचन डेव्हलपर्स यांच्याच बांधकाम प्रकल्पावर काम करत होते.

मुख्यमंत्र्यांचेही चौकशीचे आदेश

या दुर्घटनेच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष समिती नेमली आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना 25 हजार रुपयांची मदतही जाहीर केली आहे. तसेच त्या मजुरांचे मृतदेह विमानाने त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

पुणे दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या नातेवाईंकाना एकूण 9 लाख रुपये मदत मिळणार आहे. नॅशनल डिझास्टर रेस्क्यू मॅनेजमेंट (एनडीआरएम) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या : 

Pune Wall Collapse : मृतांच्या नातेवाईकांना 9 लाख, मृतदेह विमानाने बिहारला पाठवणार

Pune Wall Collapse: नेमकं काय घडलं?

पुण्यात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू

Follow Us
इथेच घोडं अडलं! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज मिळणार, तिकडे गिते काही
इथेच घोडं अडलं! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज मिळणार, तिकडे गिते काही ऐकेना, महायुतीत मोठी खलबत
नाशिकच्या राजकारणात खलबतं! गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
Maratha Reservation | सरकारच्या आश्वासनांचा भंग? विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?