AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पतीचा तारुण्य अवस्थेत गोचर, राशीचक्रावर असा होणार परिणाम

ज्योतिषशास्त्राचं गणित वेगवेगळ्या दृष्टीकोनावर अवलंबून असतं. कोणता ग्रह कोणत्या राशीत विराजमान आहे, इथपासून कोणत्या दृष्टीने पाहात इथपर्यंत आकडेमोड केली जाते. त्याचबरोबर ग्रहांची कुमार, युवा आणि वृद्ध अशी स्थिती असते. त्यामुळे गोचर कालावधी त्याचा प्रभाव पडत असतो.

12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पतीचा तारुण्य अवस्थेत गोचर, राशीचक्रावर असा होणार परिणाम
देवगुरु बृहस्पतींना 12 वर्षानंतर मिळालं पुन्हा तेज, गोचर कालावधीत या राशींवर होईल सकारात्मक परिणाम
| Updated on: Jan 23, 2024 | 6:09 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ठरावीक कालावधीनुसार ग्रहांचं गोचर होत असतं. कधी वक्री, कधी उदय-अस्त स्थिती, तर कधी कुमार-युवा-वृद्ध स्थितीत ग्रह असतात. म्हणजे ग्रह ठरावीक कालावधी या अवस्थेतून संक्रमण करतात. त्यामुळे ग्रहांच्या अवस्थेचा बारकाईने अभ्यास केला जातो. ग्रह युवा अवस्थेत वेगाने फळं देतात. देवगुरु बृहस्पती 19 जानेवारीपासून युवा अवस्थेत आला आहे. सध्या मेष राशीत असून शक्तिशाली डिग्रीत गोचर करत आहे. ग्रह 12 ते 18 डिग्रीपर्यंत गोचर करत असतो. त्यामुळे गुरुच्या फलश्रूतीचा वेग अधिक असणार आहे. या कालावधीत राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. खासकरून तीन राशीच्या जातकांना या कालावधीत मानसन्मान आणि धनलाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊयात या राशींबाबत

या राशींना मिळणार लाभ

मेष : गुरु ग्रह याच राशीत युवा अवस्थेत गोचर करत आहे. 30 एप्रिलमध्ये याच राशीत गुरु असणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना या कालावधीत चांगल्या बातम्या कानावर पडतील. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. तसेच नशिबाची उत्तम साथ या कालावधीत मिळू शकते. नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. आत्मविश्वासात दुपटीने वाढ होईल.

धनु : या राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. त्यात पंचम स्थानात विराजमान असून युवा अवस्थेत गोचर करत आहे. त्यामुळे बौद्धिक क्षमता या कालावधीत वाढेल. गुरुची पंचम दृष्टी भाग्य आणि नवम दृष्टी लग्न भावावर आहे. यामुळे वकील, ज्योतिष, न्यायाधीक, लेखन क्षेत्रतील जातकांना लाभ मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल.

मीन : या राशीचं स्वामित्व गुरु ग्रहाकडे आहे. युवा अवस्थेतील गुरु धन स्थानात आहे. त्यामुळे या कालावधीत अचानक धनलाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक फरक दिसून येईल. आपले विचार समोरच्या व्यक्तीला पटतील. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित बदल होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.