500 वर्षानंतर शनि वक्री आणि गुरुचा वेग वाढल्याने गणित बदलणार ! अशा होणार उलथापालथी

ग्रहमंडळात ग्रहांच्या स्थितीत बदल होताच त्याचा प्रभाव व्यक्ती आणि पृथ्वीतळावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास करून त्याबाबत भाकीत वर्तवलं जातं. 500 वर्षानंतर शनि आणि गुरूची विचित्र स्थिती असणार आहे. त्यामुळे 14 मे नंतर बरंच काही घडणार आहे.

500 वर्षानंतर शनि वक्री आणि गुरुचा वेग वाढल्याने गणित बदलणार ! अशा होणार उलथापालथी
शनि आणि गुरु
Image Credit source: TV9 Network
| Updated on: May 01, 2025 | 5:09 PM

आपल्या आयुष्यात विचित्र घडामोडी घडायला सुरुवात झाली की ग्रहाताऱ्यांची आठवण येते. कोणता ग्रह आपल्याला अशुभ फळं देतोय, याचं गणित मांडलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहमंडळातील ग्रह कधी वक्री तर कधी वेगाने राशी बदल करतात. त्यामुळे राशीचक्रावर त्याचा शुभ अशुभ परिणाम दिसून येतो. गोचर कुंडलीनुसार मे महिना हा खूप महत्त्वाचा आहे. कारण गुरु ग्रह 14 मे रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. पण या राशीत वेगाने मार्गक्रमण करणार आहे. ज्योतिषीय भाषेत त्याला अतिचारी गती म्हणतात. म्हणजेच पाच महिन्यातच गुरु ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच पाच महिन्यात गुरुचा वेग दुप्पट असणार आहे. खरं तर गुरु ग्रह ग्रह एका राशीत 13 महिने राहतो. पण या वेळी गुरुचा वेग पाहता पाच महिन्यातच राशी बदल करणार आहे. 18 ऑक्टोबरला गुरु ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. तर शनि वक्री स्थिती असल्याने मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम होणार आहे.

गुरु ग्रहाचा वेग आणि शनिचं वक्री असणं पाच राशींसाठी लाभदायी आहे. वृषभ, मिथुन, मीन, तूळ आणि मकर राशीच्या जातकांना ही स्थिती लाभदायी ठरणार आहे. या जातकांना नोकरीत अपेक्षित यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना नोकरीची संधी चालून येईल. इतकंच काय तर मनासारखी नोकरी मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. व्यवसायिकांना हा कालावधी चांगला जाईल. उद्योगधंद्यात अपेक्षित प्रगती दिसून येईल. तसेच अडकलेली कामं झटपट मार्गी लागतील. एकंदरीत पाच महिन्यांचा कालावधी बरा जाईल.

मेष, कर्क, धनु आणि कुंभ या राशींना गुरु आणि शनिच्या स्थितीचा संमिश्र लाभ मिळेल. पण काही कामं मार्गी लागल्याने दिलासा मिळेल. खासकरून नोकरी बदलण्याच्या स्थितीत असलेल्यांना नोकरीची संधी चालून येईल. पण नोकरीत बदल झाला तरी त्रास तितका कमी होणार नाही. फक्त नोकरी आणि तिथली माणसं बदलल्याने तेवढं काय ते बरं वाढेल. पगार वाढीसोबत जबाबदाऱ्याही वाढतील. त्यामुळे ताण वाढेल आणि चिडचिड होईल. पण त्यावर नियंत्रण ठेवलं आणि संयम राखून कामं केलं तर नक्कीच यश मिळेल.

सिंह, वृश्चिक या दोन राशींना वक्री शनि आणि अतिचारी गुरुच्या बळामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत ताकही फुंकून पिणं गरजेचं आहे. महत्त्वाची कामं शक्यतो तर स्वत: करावी आणि दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. एखाद्या महत्त्वाच्या कामात दगाफटका होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे या कालावधीत काळजी घ्या.