AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर शनिदेवांचा स्वत:च्या नक्षत्रात प्रवेश, या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ

ग्रहमंडळात ठराविक कालावधीनंतर बऱ्याच घडामोडी घडत असतात. एखाद्या ग्रहाने राशीबदल किंवा नक्षत्र परिवर्तन केलं तर त्याचा परिणाम राशीचक्रावर होतो. न्यायदेवता शनिदेवांनी नक्षत्र बदल केला आहे. त्यामुळे तीन राशींचं भलं होणार आहे.

अखेर शनिदेवांचा स्वत:च्या नक्षत्रात प्रवेश, या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ
शनिदेवImage Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 28, 2025 | 8:35 PM
Share

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता संबोधलं गेलं आहे. शनिमहाराजांची एखाद्यावर कृपा झाली तर रंकाचा राजा होण्यास वेळ लागत नाही. शनि महाराज जातकाला त्याच्या कर्मानुसार फळं देतात. त्यामुळे शनि महाराज राशीला येणार म्हंटलं की भल्याभल्यांची पुरती दैना होते. त्यामुळे शनि महाराज कोणत्या स्थितीत विराजमान आहेत याकडे लक्ष लागून असतं.शनि महाराज सध्या मीन राशीत विराजमान आहेत. दुसरीकडे, शनि महाराजांनी नक्षत्र परिवर्तन केलं आहे. शनि महाराजांनी स्वत:च्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला. या नक्षत्रात 3 ऑक्टोबरपर्यंत असणार आहेत. या नक्षत्रावर शनिचं अधिपत्य आहे. त्यामुळे काही राशींना या बदलामुळे लाभ मिळणार आहे. करिअर आणि उद्योगधंद्यात प्रगती होताना दिसेल. चला जाणून घेऊयात लकी राशींबाबत

वृषभ : या राशीच्या जातकांना शनिच्या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ मिळणार आहे. कारण या राशीच्या उत्पन्न आणि लाभ स्थानात शनिदेव गोचर करत आहेत. अशा स्थितीत शनिच्या नक्षत्र बदलाचा जातकांना लाभ मिळेल. नव्या स्रोताकडून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाचा करार या कालावधीत निश्चित होऊ शकतो. यामुळे दीर्घकालीन फायदा दर्शवत आहे. या कालावधीत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कर्क : या राशीच्या जातकांवर शनि महाराजांचा सकारात्मक प्रभाव पडेल. या राशीच्या भाग्य स्थानात शनि महाराज गोचर करत आहेत. यामुळे जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. करिअरमध्ये प्रगतीची नवी दारं खुली होतील. विदेशात प्रवासाचा योग जुळून येईल. लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या जातकांना चांगली स्थळं चालून येतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

तूळ : या राशीच्या सहाव्या स्थानात शनि महाराज गोचर करत आहेत. या काळात न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते. तसेच गुप्त शत्रूंवर सहज विजय मिळवाला. कोणाकडून उसनवारी घेतली असेल तर या काळात त्याची परतफेड होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल. या काळात वाहन आणि प्रॉपर्टी घेऊ शकता. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट