AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : फेब्रुवारीत फक्त 7 दिवस बुध-शुक्राची युती, लक्ष्मी नारायण योगामुळे तीन राशींना लाभ

ग्रहांच्या गोचरामुळे राशीचक्रावर परिणाम होत असतो. ग्रहाने राशी बदलली की 12 स्थानांवर प्रभाव टाकतात. त्यामुळे जातकांना चांगल्या वाईट परिणामांना सामोर जावं लागतं. कधी ग्रहांची युती फलदायी ठरते. असाच एक योग फेब्रुवारी महिन्यात जुळून येत आहे. त्यामुळे तीन राशींच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

Astrology : फेब्रुवारीत फक्त 7 दिवस बुध-शुक्राची युती, लक्ष्मी नारायण योगामुळे तीन राशींना लाभ
फेब्रुवारीत मकर राशीत बुध शुक्र येणार एकत्र, लक्ष्मी नारायण योगामुळे तीन राशींचं होणार भलं
| Updated on: Jan 20, 2024 | 5:34 PM
Share

मुंबई : ग्रहांचं गोचर आणि त्यांची दृष्टी ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्वाची असते. कोणता ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे आणि कोणत्या दृष्टीने पाहात आहे यावरून आकलन केलं जातं. प्रत्येक ग्रहाच्या स्थितीवरून अंदाज व्यक्त केला जातो. कधी कधी दोनपेक्षा अधिक ग्रह एकाच राशीत येतात. त्यामुळे त्या दोन ग्रहांमुळे तयार होणार योग राशीचक्रावर प्रभाव टाकत असतो. मित्र ग्रह असतील तर ठीक, नाही तर अभद्र युतीचा फटका सहन करावा लागतो. फेब्रुवारी महिन्यात बुध आणि शुक्राच्या युतीमुळे शुभ असा लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे. फेब्रुवारी महिन्यात फक्त 7 दिवसांसाही हे दोन ग्रह एकत्र येणार आहे. अर्थात या सात दिवसात काही राशींना पाठबळ मिळणार आहे. 1 फेब्रुवारीला बुध ग्रह धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 12 फेब्रुवारीला शुक्र ग्रह सकाळी 4 वाजून 41 मिनिटांनी मकर राशीत येईल. त्यानंतर 20 फेब्रुवारीला बुध ग्रह सकाळी 6 वाजता कुंभ राशीत प्रवेश करताच हा योग संपुष्टात येईल.

या तीन राशींना मिळणार लाभ

मेष : या राशीच्या दशम स्थानात बुध आणि शुक्राची युती होत आहे. या स्थानाला उत्पन्नाचं स्थान संबोधलं जातं. या दोन्ही ग्रहांच्या युतीचा सकारात्मक परिणाम या स्थानावर होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच या कालावधीत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. शुक्राच्या प्रभावामुळे आपल्या शब्दाला मान मिळेल. त्यामुळे काही कामं झटपट पूर्ण होतील.

कन्या : या राशीच्या चतुर्थ स्थानात बुध आणि शुक्राची युती होत आहे. या युतीमुळे वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. आर्थिक घडी या कालावधीत बसेल. नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित परिणाम दिसून येतील. बॉसकडून कौतुकाची थाप पाठीवर पडेल. त्यामुळे काम करण्याचा हुरूप वाढेल.

मकर : या राशीच्या लग्न स्थानात म्हणजेच प्रथम स्थानात बुध शुक्राची युती होत आहे. यामुळे आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. बुध वाणीचा कारक आणि शुक्र प्रसिद्धीचा कारक असल्याने प्रभाव दिसून येईल. आपली समाजमनात वेगळीच छाप पडेल. आत्मविश्वासामुळे मोठी डील करू शकता. आपण जो शब्द देऊ ते पाळण्याचा इतर लोक प्रयत्न करतील. कौटुंबिक स्तरावर चांगलं वातावरण राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती