30 वर्षांनंतर रवि-शनिमुळे शक्तिशाली नवपंचम योग, या राशींची आर्थिक गणितं सुटणार
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य शनि हे पितापूत्र असले तरी या दोघांचं काही पटत नाही. पण 30 वर्षानंतर या दोन ग्रहांमुळे शक्तिशाली असा नवपंचम योग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात त्या राशींबाबत

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक दिवशी प्रत्येक सेकंदाला ग्रहांची स्थिती बदलत असते. त्याचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. चंद्र तर सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. राशीत अडीच दिवसांनी, तर नक्षत्र प्रत्येक दिवशी बदलतो. त्यामुळे चंद्राला नक्षत्रांचा अधिकती म्हंटलं जातं. त्यामुळे ग्रहांच्या अशा वेगवान स्थितीमुळे काही शुभ अशुभ योग तयार होत असतात. शनि हा सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. तर सूर्य हा दर महिन्याला राशी बदल करतो. या स्थितीमुळे सध्या एक योग तयार झाला आहे. हा शुभ योग आहे. शनि आणि सूर्यामुळे हा योग तयार झाला आहे. शनि हा ग्रह सध्या मीन राशीत आहे. तर सूर्य स्वत:च्या सिंह राशीत बसला आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 120 अंशावर आहेत. त्यामुळे हा राजयोग तयार होत आहे. या दोन्ही ग्रहांमध्ये वैर असलं तरी या स्थितीचा लाभ काही राशींना मिळणार आहे. खासकरून तीन राशी लकी ठरणार आहेत.
मेष : शनि साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यात शनि वक्री असल्याने सध्या प्रभाव कमी आहे. त्यात सूर्य आणि शनिमुळे नवपंचम राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. कौटुंबिक पातळीवर चांगले संबंध प्रस्थापित होतील. वडिलांकडून तुम्हाला मदत होऊ शकते. तसेच अतिरिक्त होणारा खर्च कमी होईल.
मिथुन : या राशीच्या जातकांना रवि-शनीचा नवपंचम राजयोग फायदेशीर ठरणार आहे. अनेक क्षेत्रात याचा सकारात्मक प्रभाव पडेल. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात तिथे तुम्हाला चांगली फळं मिळतील. तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. तुम्हाला कामानिमित्त विदेशात जाण्याचा योग जुळून येईल. तुमच्या अडीअडचणीला लोकं धावून येतील. काही कामं पटकन आणि सुरळीत पार पडतील. एकंदरीत हा काळ आनंदात जाईल.
मीन : या राशीतच शनि महाराज बसले आहेत. त्यामुळे रवि शनिचा सकारात्मक प्रभाव दिसेल. साडेसातीचा मधला टप्पा असला तरी काही अंशी दिलासा मिळेल. शनि वक्री असल्याने येणारी संकट सौम्य असतील. या काळात तुमची कामं झटपट पूर्ण होतील. त्यामुळे किचकट कामं पूर्ण करण्यावर भर द्या. भागीदारीच्या धंद्यात चांगलं यश मिळू शकते. आरोग्यवरही चांगला परिणाम दिसून येईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
