297 वर्षानंतर राखी पौर्णिमेला सहा ग्रहांचा दुर्लभ योग, या राशींचे येणार चांगले दिवस
अवघ्या दोन दिवसांवर राखी पौर्णिमेचा सण आहे. या दिवशी ग्रहांचा अनोखा मेळ असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 297 वर्षानंतर असा दुर्मिळ योग जुळून येणार आहे. यामुळे काही राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर भाकीत वर्तवलं जातं. मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर ग्रहांचा कसा प्रभाव असणार आहे याबाबत सांगितलं जातं. राखी पौर्णिमेला 297 वर्षानंतर अशी स्थिती जुळून येणार आहे. यापूर्वी 1728 या वर्षी असं घडलं होतं. त्यामुळे यंदाची राखी पौर्णिमा विशेष असणार आहे. सूर्य कर्क राशीत, चंद्र मकर राशीत, मंगळ कन्या राशीत, बुध कर्क राशीत, गुरु-शुक्र मिथुन राशीत, राहु कुंभ राशीत, तर केतु सिंह राशीत असणार आहे. 297 वर्षापूर्वी जुळून आलेल्या योगात भद्रा काळ नव्हता हे देखील विशेष आहे. यंदाही तसंच आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधू शकतो. तसेच या योगामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात त्या लकी राशींबाबत
या राशींना मिळणार लाभ
तूळ : या राशीच्या आयुष्यात बऱ्याच कालावधीनंतर ग्रहांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं या कालावधीत पूर्ण होतील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात सकारात्मक परिणाम दिसून येतील. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना यश मिळेल. नवीन कौशल्य शिकून एखादा छोटा व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करा.
मकर : या राशीच्या जातकांना सहा ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. आलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. तसेच नोकरी करणाऱ्या जातकांनाी पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. भागीदारीच्या धंद्यातून अपेक्षित लाभ मिळेल. त्यामुळे हा काळ फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे या काळात आर्थिक घडी नीट बसवून घ्या.
कुंभ : या राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. या कालावधीत तुम्हाला मानसन्मान मिळेल. वडिलोपार्जित जमिनीतून चांगला मोबदला मिळेल. तसेच प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तुम्ही गुंतवणून केलेल्या योजनांमधून चांगला परतावा मिळेल. काही आनंदाच्या बातम्या कानावर पडतील. नोकरी करणाऱ्या जातकांना अचानक मोठं पद मिळू शकते. एकंदरीत आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
