18 ऑगस्टपासून या राशींचं नशिब चमकणार, 50 वर्षानंतर शक्तिशाली त्रिग्रही योग
ज्योतिषशास्त्रानुसार, एकाच राशीत दोन पेक्षा जास्त ग्रह आले तर शक्तिशाली योग तयार होतो. अशीच काहीशी स्थिती मिथुन राशीत आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत...

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती काही ठराविक कालावधीनंतर बदलत असते. ग्रहांची स्थिती बदलली की एकापेक्षा अधिक ग्रह एकाच राशीत एकत्र येऊ शकतात. अशी स्थिती वारंवार घडत असते. तीन ग्रह एकत्र आले तर त्रिग्रही आणि चार ग्रह एकत्र आले तर चतुर्ग्रही योग तयार होतो. त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो. 26 जुलैला शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या राशीत आधीच ठाण मांडून बसलेल्या गुरु ग्रहासोबत युती झाली आहे. आता 18 ऑगस्टला या राशीत चंद्र प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्रिग्रही योग जुळून येणार आहे. मिथुन राशीत शुक्र, गुरु आणि चंद्राची युती होणार आहे. अडीच दिवसांसाठी ही युती होणार आहे. कारण नंतर चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल. पण अडीच दिवसात तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. कसं काय ते जाणून घ्या
तूळ : या राशीच्या जातकांना त्रिग्रही योगाचा लाभ मिळणार आहे. कारण हा योग लाभ स्थानात होत आहे. त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशनची संधी मिळू शकते. इतकंच काय तर पगारवाढ होऊ शकते. अविवाहित असलेल्यांना काही स्थळं चालून येतील. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला संकटात साथ मिळेल.
मिथुन : या राशीतच तीन ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना नक्कीच लाभ मिळेल. लग्न रास असल्याने व्यक्तीमत्त्वात बदल दिसून येईल. आत्मविश्वास दुपटीने वाढेल. समाजात मानसन्मान मिळेल. कायदेशीर प्रकरणात यश मिळेल. हातातून गेलेल्या गोष्टी मिळण्यास सुरुवात होईल. एकंदरीत घरगुती वातावरण चांगलं राहील आणि त्यांचा तुमच्या कामाला पाठिंबा मिळेल. काही दीर्घकालीन आजारातून सुटका होऊ शकते.
कन्या : या राशीच्या कर्मस्थानात त्रिग्रही योग तयार होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना केलेल्या प्रत्येक कामातून दुप्पट यश मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रत्येक गोष्टीची अनुभूती मिळेल. आतापर्यंत तुम्हाला ज्या कामातून डावललं जात होतं. तेथून तुम्ही चांगलं यश मिळवाल. व्यवसायिकांना उद्योगधंद्यात विस्तार करण्याची संधी आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
