30 वर्षानंतर शनि आणि मंगळ ग्रहाचा विचित्र योग, पण या राशींना मिळणार दिलासा
रक्षाबंधन या सणादिवशी शनि आणि मंगळ हे दोन पापग्रह आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे 30 वर्षानंतर शक्तिशाली समसप्तक योग तयार होणार आहे. यामुळे तीन राशींचं भलं होणार आहे.

ज्योतिषशास्त्राचं संपूर्ण गणित हे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. ग्रहाच्या गोचरासोबत शुभ अशुब योग तयार होत असतात. त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो. त्यामुळे काही विधीलिखित घटना होतात असा समज आहे. त्यावरून भाकीत वर्तवलं जातं. मंगळ ग्रहाने मागच्या महिन्यात म्हणजेच 28 जुलैला कन्या राशीत प्रवेश केला आहे. तर न्यायदेवता मीन राशीत विराजमान आहे. त्यामुळे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या स्थानात आहेत. त्यामुळे राशीचक्रात समोरासमोर आले आहेत. यामुळे दोन्ही ग्रहांमुळे समसप्तक योग तयार झाला आहे. अशा स्थितीमुळे काही राशींना लाभ मिळणार आहे. या राशींच्या उत्पन्नात वाढ आणि करिअरमध्ये प्रगतीचे दार खुलं होणार आहे . देशविदेशात प्रवास करण्याचा योग जुळून येईल. चला जाणून घेऊयात त्या राशींबाबत
कुंभ : या राशीच्या जातकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. म्हणजेच शनिदेव दुसऱ्या स्थानात आहेत. या राशीचा स्वामी ग्रह शनि आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान मिळेल. तसेच प्रगतीची नवं दारं खुली होतील. नोकरी करणाऱ्या जातकांना हा काळ अनुकूल जाईल. वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. तुम्ही विचार केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात साकारता येतील.
धनु : या राशीच्या जातकांना मंगळ आणि शनिच्या समसप्तक योगाचा लाभ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. तसेच केलेल्या करारातून उत्तम लाभ मिळेल. आर्थिक गणित या काळात सुटतील. तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळू शकतात. प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकतात.
तूळ : या राशीच्या जातकांना समसप्तक योगाचा चांगला लाभ मिळेल. गेल्या काही दिवसात डोक्यावर असलेला अडचणींचा डोंगर कमी होईल. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. तसेच धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होईल. गुप्तशत्रूंचा कट उधळून लावण्यात यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
