शुक्र आणि युरेनस ग्रहामुळे या राशींचं नशिब 1 ऑगस्टपासून पालटणार, आर्थिक झटपट सुटणार!
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास करून भाकीत वर्तवलं जातं. शुक्र आणि युरेनस ग्रहांची स्थिती अशीच काहिशी आहे. दोघंही एकमेकांपासून 30 डिग्रीवर आहेत, त्यामुळे द्विद्वादश योग तयार झाला आहे.

ज्योतिषशास्त्रात शुक्र या ग्रहाला भौतिक सुखांचा कारक मानलं गेलं आहे. पैसा, गाडी, बंगला हे सर्व काही शुक्राच्या अधिपत्याखाली येते. अशा स्थितीत शुक्राची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. शुक्राची स्थिती चांगली असली की आयुष्यातील एक टप्पा खूपच चांगला जातो. शुक्र हा दर 26 दिवसांनी राशीबदल करतो. वक्री किंवा अस्त-उदय झाला तर पाठीपुढे होते. पण शुक्राची स्थिती खूपच महत्त्वाची ठरते. शुक्राचा भ्रमण कालावधी पाहिला तर युती आघाडी होत असते. त्यामुळे शुभ अशुभ परिणाम दिसून येते. सध्या शुक्र ग्रह बुध ग्रहाच्या मिथुन राशीत आहेत. या राशीत बुध ग्रह आहे. त्यामुळे या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. 1 ऑगस्टपासून या स्थितीत बदल होणार आहे. 1 ऑगस्टला सकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी शुक्र आणि युरेनस हे ग्रह एकमेकांपासून 30 डिग्री अंशावर असणार आहेत. त्यामुळे द्वि्द्वादश योग तयार होत आहे. शुक्र मिथुन राशीत तर युरेनस हा वृषभ राथीत आहे. युरेनस एका राशीत सात वर्षे राहतो. त्यामुळे एका राशीत पुन्हा येण्यासाठई 84 वर्षांचा कालावधी लागतो.
या तीन राशींना मिळणार लाभ
मिथुन : शुक्र आणि युरेनसची युती या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. या राशीच्या लग्न स्थानात शुक्र आणि 12 व्या स्थानात युरेनस आहे. त्यामुळे करिअरवर त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. नोकरी करणाऱ्या जातकांना बोनस किंवा पगारवाढ मिळू शकते. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य त्या ठिकाणी नोकरी मिळू शकते. या कालावधीत वैवाहिक जीवनही चांगलं असणार आहे. भौतिक सुखाची अनुभूति या कालावधीत घेता येणार आहे.
तूळ : शुक्र आणि युरेनस हे ग्रह या राशीवर सकारात्मक प्रभाव टाकेल. या राशीच्या नवव्या स्थानात शुक्र ग्रह आहे. त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच धार्मिक विधी आणि देवदर्शन या कालावधीत पार पडेल. समाजातील मानसन्मान या कालावधीत वाढेल. कामानिमित्त लांबचा प्रवास करण्याच योग जुळून येईल. या कालावधीत आर्थिक गणित सुटतील.
कुंभ : शुक्र आणि युरेनस ग्रहामुळे द्विद्वादश योग तयार होणार आहे. यामुळे जातकांच्या गेल्या काही दिवसांपासूनच्या इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवनातील कलह दूर होतील. तसेच भागीदारीच्या धंद्यात चांगलं यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. खासगी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनचा योग आहे. बॉसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
