Astrology 2026: शुक्र-चंद्राचा प्रभाव; या तीन राशींसाठी 3 सप्टेंबर ठरेल गेमचेंजर!
ग्रहमंडळात प्रत्येक दिवसाला काही ना काही घडामोडी बदलत असतात. त्याचा परिणाम राशीचक्रावर होत असतो. 3 सप्टेंबरलाही राशीचक्रात दोन ग्रहांचा प्रभाव असणार आहे. शुक्र आणि चंद्राची स्थिती महत्त्वाची ठरणार आहे.

राशीचक्रात ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिष अंदाज बांधतात. 3 सप्टेंबर रोजी शुक्र आणि चंद्र ग्रहाची स्थिती महत्त्वाची ठरणार आहे. कारण शुक्र ग्रहाने 2 सप्टेंबरलाच तूळ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे अत्यंत शुभ असा ‘मालव्य राजयोग’ आणि बुध-शुक्राच्या युतीमुळे ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ तयार झाला आहे. तर या दिवशी चंद्र सकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी मेष राशीतून स्वतःच्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे चंद्राचे बळ वाढेल. याशिवाय सूर्य आणि बुधाच्या प्रभावामुळे ‘बुधादित्य राजयोग’ आणि ‘व्याघात योग’ असणार आहे. त्यामुळे राशीचक्रातील तीन राशींना लाभ मिळणार आहे, असं ग्रहमान सांगतं. चला जाणून घेऊयात तीन लकी राशींबाबत…
या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
तूळ : स्वराशीत शुक्र ग्रह आल्याने या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. मान-सन्मान मिळेल आणि आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. कारण या राशीचा स्वामी शुक्र असल्याने हा गोचर काळ हा सुवर्णकाळ असणार आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायामध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. काही अडचणीतून तुम्हाला सुटका मिळेल. विशेष म्हणजे वैयक्तिक आयुष्यात आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.
कर्क: गुरु आणि चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे या राशींसाठी अनुकूल काळ असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरीमध्ये तुमचे काम अपेक्षेपेक्षा जास्त चांगले होईल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खूश राहतील. तुम्हाला विविध आणि नवीन स्रोतांकडून चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार तुमच्या फायद्याचे ठरतील. गुंतवणुकीसाठी हा दिवस खूप फलदायी ठरेल. पण तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या.
मकर : उच्च राशीतील चंद्राचे पाठबळ आणि राजयोगाच्या प्रभावामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळेल. या काळात भाग्याची पूर्ण साथ मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली अत्यंत महत्त्वाची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ किंवा वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित एखादा मोठा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. नवीन वाहन किंवा हक्काचे घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न असेल, तर या दिवशी त्यासंबंधी सकारात्मक हालचाली होताना दिसतील.
(डिस्क्लेमर : सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)
