AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : 12 वर्षानंतर गुरूचे मेष राशीत संक्रमण, या चार राशीच्या लोकांना करावा लागेल समस्यांचा सामना

गुरु हा एक शुभ ग्रह मानला जातो ज्याचा करियर आणि वैवाहिक जीवनावर शुभ प्रभाव पडतो. बृहस्पतिच्या प्रतिगामीपणामुळे अनेक राशींना (Astrology) जीवनात समस्यांना सामोरे जावे लागेल.

Astrology : 12 वर्षानंतर गुरूचे मेष राशीत संक्रमण, या चार राशीच्या लोकांना करावा लागेल समस्यांचा सामना
गुरू गोचर
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 11, 2023 | 6:41 PM
Share

मुंबई : देव गुरु बृहस्पति 12 वर्षांनंतर मेष राशीत प्रतिगामी मार्गक्रमण करेल. गुरू 4 सप्टेंबर रोजी मेष राशीत आपला मार्ग बदलेल आणि राहूच्या विरुद्ध दिशेने जाईल. गुरु हा एक शुभ ग्रह मानला जातो ज्याचा करियर आणि वैवाहिक जीवनावर शुभ प्रभाव पडतो. बृहस्पतिच्या प्रतिगामीपणामुळे अनेक राशींना (Astrology) जीवनात समस्यांना सामोरे जावे लागेल. मेष राशीत राहू बरोबर गुरू ग्रह प्रतिग्रामी होईल तेव्हा कोणत्या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल हे जाणून घेऊया.

वृषभ राशीवर प्रतिगामी बृहस्पतिचा प्रभाव

वृषभ राशीच्या लोकांना गुरू मेष राशीत प्रतिगामी होत असताना प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागेल. या काळात तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. पैशाच्या बाबतीत तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक बाबतीत कोणताही चुकीचा निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवण्याचा किंवा नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही काळ थांबले पाहिजे. नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार करू नका. गुरुवारी भगवान विष्णूला झेंडूचे फूल अर्पण करा.

मिथुन राशीवर प्रतिगामी बृहस्पतिचा प्रभाव

मिथुन राशीच्या व्यावसायिकांसाठी गुरूचे संक्रमण अडचणी वाढवू शकते. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. याचा परिणाम तुमच्या कामावर होईल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. यावेळी, विवाहाशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. विवाहित लोकांच्या आयुष्यात काही गैरसमजामुळे भांडणे होऊ शकतात. गुरुवारी गायीला हरभरा डाळ आणि गूळ खाऊ घाला आणि मोठ्यांचा आदर करा.

कन्या राशीवर प्रतिगामी बृहस्पतिचा प्रभाव

मेष राशीतील गुरुचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत अशुभ मानले जाते. वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मित्रांसोबतचे तुमचे संबंध काही कारणाने प्रभावित होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतल्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. यावेळी पैशाशी संबंधित कोणताही निर्णय न घेणे चांगले. तुमच्या सासरच्या व्यक्तीशी तुमचे संबंध बिघडू शकतात. तुम्ही नवीन जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता थांबा. एखाद्या व्यवहारात तुमचे नुकसान होऊ शकते. भगवान सत्यनारायणाची कथा सांगा.

वृश्चिक राशीवर प्रतिगामी बृहस्पतिचा प्रभाव

बृहस्पति प्रतिगामी असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक नवीन समस्या उद्भवू शकतात. असे काही खर्च असू शकतात ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल. इच्छा नसतानाही काही लोकांना भेटावे लागू शकते. प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्या पालकांसोबतच्या नातेसंबंधावरही परिणाम होऊ शकतो. फालतू खर्च वाढतील आणि तुम्हाला कुठूनतरी कर्ज घ्यावे लागेल. गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून तुळशीला तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घालावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...