AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : पत्रिकेत दूर्बल सूर्यामुळे नोकरीत करावा लागतो समस्यांचा सामना, या प्रभावी उपायांनी मिळतो लाभ

सूर्य दूर्बल असेल तर वडिलांशी संबंध मधूर नसतात. नोकरीतून निलंबित होणे किंवा खोटे आरोप लागणे, अपमान होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. जोतिषशास्त्रात असे अने उपाय आहेत..

Astrology : पत्रिकेत दूर्बल सूर्यामुळे नोकरीत करावा लागतो समस्यांचा सामना, या प्रभावी उपायांनी मिळतो लाभ
पत्रिकेत सूर्यImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 10, 2023 | 4:50 PM
Share

मुंबई : सूर्य बलवान (Sun In Kundali) असेल तर मान-सन्मान, सुख-समृद्धी मिळते, वडिलांचा सहवास व सहकार्य लाभते. सूर्य दूर्बल असेल तर वडिलांशी संबंध मधूर नसतात. नोकरीतून निलंबित होणे किंवा खोटे आरोप लागणे, अपमान होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. जोतिषशास्त्रात असे अने उपाय आहेत ज्यामुळे ग्रहांचा राजा सूर्याला पत्रिकेत बळकट करता येते. सूर्याची उर्जा लाभल्याने व्यक्तीची धनहानी टळते या शिवाय अनेक अर्थार्जनाचे मार्ग खुले होतात. जाणून घेऊयी सूर्याला बलवान करण्यासाठी कोणते ऊपाय करावे तसेच पत्रिकेत सूर्य जर दूर्बल असेल तर कसे अनुभव येतात.

पत्रिकेत सूर्य दूर्बल असल्यास येतात असे अनुभव

गुरू आणि वडीलांचा साथ लाभत नाही. खोटे आळ येतात. शिक्षणात अडथळे येतात. नोकरीत अपमान सहन करावा लागतो. सोन्याची चोरी होते. ह्रदयाशी संबंधीत त्रास जाणवतो.

पत्रिकेतील सूर्य ग्रह बलवान करण्याचे उपाय

  1. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी ब्रह्म मुहूर्तावर सर्वप्रथम उठून स्नान करावे. यानंतर एका तांब्याच्या गडव्यात पाणी घेऊन त्यात काही अक्षत, फुले आणि दुर्वा टाकून त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे.  असे रोज केल्याने सूर्य ग्रहाशी संबंधित दोष कमी होतात.
  2. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील सूर्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी रत्न धारण करणे देखील फायदेशीर मानले जाते. जर तुमच्या पत्रिकेत सूर्य कमजोर असेल तर माणीक रत्न धारण करणे शुभ मानले जाते. कोणत्याही ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय रत्ने घालू नये याची विशेष काळजी घ्या.
  3. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सूर्याशी संबंधित दोषही दूर होतात. रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने ग्रह दोष दूर होतात.
  4. ज्यांच्या कुंडलीत सूर्य ग्रहाशी संबंधित दोष आहेत त्यांनी रविवारी व्रत ठेवावे. तसेच रविवारी मीठाचे सेवन करू नये.
  5. ग्रह दोष दूर करण्यासाठी दान आणि दक्षिणा देखील लाभदायक मानली जाते. रविवारी एखाद्या गरजू व्यक्तीला गूळ, सोने, कपडे, गहू इत्यादी वस्तू दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...