AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी कुठलाही निर्णय घाईत घेऊ नये

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कुठल्या राशींसाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. कोणाला आज सावधगिरीने राहण्याची गरज आहे

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी कुठलाही निर्णय घाईत घेऊ नये
आजचे राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 18, 2022 | 5:00 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष-  नशीब तुमच्या सोबत आहे. तुम्ही कोणत्याही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या गोड बोलण्याने गोड तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. त्याचप्रमाणे तुमच्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने आपलं कार्य यशस्वी कराल. कामाच्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.
  2. वृषभ- मन प्रसन्न होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवेल. तुम्हाला प्रवासाचा आनंद मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. दिवस चांगला सुरू होईल. तुमच्यात नवीन उत्साह पहायला मिळेल.
  3. मिथुन- कौटुंबिक जीवनाच उतार-चढ़ाव दिसून येतील. परिश्रम आणि समजुतीने आयुष्याला सुखी करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. कामात चांगला आर्थिक लाभ होईल.
  4. कर्क- मन प्रसन्न होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवेल, प्रवासाचा आनंद घ्या. व्यवसायात चांगला फायदा होईल. आरोग्यही चांगलं राहील. परदेशात प्रवास करताना आनंद घ्याल.
  5. सिंह- दिवस स्फुर्तीने भरलेला असेल. परिश्रमाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. शेअर बाजारात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आनंद प्रसन्न राहील. प्रेम संबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, म्हणून आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे.
  6. कन्या- भाग्य तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. इतरांशी तुमचं बोलणं गोड असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल. आपण आपल्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने कार्य यशस्वी कराल.
  7. तुला- दिवस फार चांगला जाणार नाही. संघर्षाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटूंबाचा पाठिंबा मिळेल. म्हणून धीर सोडू नका आणि पुढील कठीण परिस्थितीचा सामना करा. वडिलांकडून योग्य मार्गदर्शन नक्की घ्या.
  8. वृश्चिक- कुठलाही निर्णय घाईत घेऊ नये . प्रयत्नांना फळ मिळेल. ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांची कामगिरी चांगली असेल. पैशाच्या आगमनाने तुम्हाला आनंद मिळेल. जास्तीत जास्त उत्पन्नाचा प्रयत्न कराल आणि यशस्वी होईल.
  9. धनु- तुमचं मन आज उत्साही असेल. ज्येष्ठांचं मार्गदर्शन केल्यास नफ्यात वाढ होईल. बर्‍याच दिवसांपासून प्रयत्न करत असलेली प्रॉपर्टी मिळवण्यात यश मिळेल. शेजार्‍यांचं सहकार्य फायद्याचं ठरेल.
  10. मकर-  तुमच्या कामाच्या क्षेत्रातील प्रयत्नांमुळे प्रगती होईल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी यश मिळू शकतं. तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. नोकरीमध्ये तुमची मेहनत कामी येईल.
  11. कुंभ- तुमच्या वेळेचा योग्य वापर केल्याने तुम्हाला फायदा होईल. आपण खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातील महत्वाच्या कामात मदत कराल.
  12. मीन- एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल आपली विचारसरणी बदलू शकते. उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. ऑनलाइन व्यवहारात सावधगिरी बाळगा. करियरसाठी नवे मार्ग खुलतील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित