AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांना नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीचा योग

दैनंदिन राशी भविष्यामध्ये तुमचा आजचा दिवस कसा जाणार आहे हे जाणून घ्या. या राशीच्या लोकांची अडकलेली कामं पूर्ण होणार आहे.

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांना नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीचा योग
राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 22, 2022 | 8:34 AM
Share

मुंबई,   ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- कुठलाही निर्णय विचारपूर्वक घ्या. कार्यक्षेत्राला प्राधान्यस्थानी ठेवा. स्मार्ट काम करण्यावर भर द्या. नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीचा योग आहे.
  2. वृषभ- नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. नव्या योजना आखा आणि त्या अनुषंगानं काम करण्याला प्राधान्य द्या.
  3. मिथुन- कुटुंबीयांशी असणारे नातेसंबंध आणखी दृढ होतील. महत्त्वपूर्ण माहिती इतरांनाही द्या, सर्वांचा फायदा यातच आहे. वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्या.
  4. कर्क- दीर्घकालीन योजना आखण्यावर भर द्या. दूरदृष्टी ठेवा, त्या धर्तीवर निर्णय घ्या. तुम्हाला लाभ होईल. आर्थिक पाठबळ मिळेल, उधार घेतलेले पैसे आज परत मिळतील.
  5.  सिंह- जवळच्या व्यक्तींची भेट घेण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. दिनचर्या आखा. राहणीमान सुधारेल. दिलेल्या शब्दाला जागा.
  6. कन्या- करिअरमध्ये मोठे निर्णय घ्याल. निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यावर भर द्या. व्यापारावर लक्ष केंद्रित करा. नव्या आर्थिक वाटा तुम्हाला गवसतील.
  7. तुळ- नातेसंबंध सुधारण्यावर भर द्या. घरात सुखशांती नांदेल. एखादं नवं वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. विरोधी सक्रिय असतील.
  8. वृश्चिक- अर्थार्जनाच्या नव्या वाटा तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. नवे मित्र बनवाल. नवं काहीतरी शिकण्यासाठी पुढाकार घ्याल.
  9.  धनु- समाजात असणारी प्रतिष्ठा वाढेल, जबाबदाऱ्या वाढतील. नोकरीच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. भविष्याच्या अनुषंगानं महत्त्वाच्या संधी मिळतील. धनलाभ होण्याचा योग आहे.
  10. मकर- शिकवणीतून पुढे जाल. पाहुण्यांची वरदळ वाढेल. कुटुंबात आनंद नांदेल. इतरांशी नम्रतेनं वागा.
  11.  कुंभ- तुमच्या वाट्याला आज यश येणार आहे. सर्वांशी मिळूनमिसळून वागा. सलोखा वाढवा. समामाजिक स्तर उंचावेल.
  12.  मीन- अडकलेली कामं पूर्ण करा. उद्योग आणि व्यापार वाढवा. ज्या कामात हात टाकाल तिथे यश मिळणार आहे. तुमच्यासोबत असणाऱ्यांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न करा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत