AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, 12 राशींसाठी असा जाणार आजचा दिवस

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. कोणत्या राशीच्या लोकांना मिळू शकतात गुप्त पैसे

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, 12 राशींसाठी असा जाणार आजचा दिवस
राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 04, 2022 | 6:44 AM
Share

मुंबई,   ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष-  आरोग्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल. नवीन ओळखीतून आर्थिक फायदा होईल. भावंडांसोबत सुरू असलेला संघर्ष तुम्हाला संपवावा लागेल, अन्यथा परस्पर संबंधात तेढ निर्माण होऊ शकतो.
  2. वृषभ- आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. दिवस सकारात्मक जाईल. प्रेम प्रकरणातील लोकांना यश मिळेल. तुमचे काही हितशत्रू तुमचा हेवा करतील.
  3. मिथुन- व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आज दिवसाची सुरुवात चांगली होईल, पण दुपारनंतर फारसा फायदा होणार नाही. व्यसनांना आवार घालण्याची गरज आहे. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. नातेवाईकांसोबत मतभेत होण्याची शक्यता आहे.
  4. कर्क-  आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचे असेल, तर त्यांना काही काळ वाट पाहावी लागेल. तुमची जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते, त्यानंतर तुम्ही धार्मिक स्थळाच्या यात्रेला जाऊ शकता.
  5. सिंह- नवीन व्यवसाय सुरू करू शकता.  नातेवाईकांच्या घरी मेजवानीसाठी जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कमी अंतराच्या प्रवासाचा योग संभवतो.
  6. कन्या-    प्रेम प्रकरणात गैरसमज होईल. तुमची समजूतदारपणा दाखवून तुम्ही या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकाल. तुम्ही नोकरी क्षेत्रात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते, त्यामुळे त्यांना घरापासून दूर जावे लागेल.
  7. तूळ-  आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असेल. तुम्ही तुमच्या खर्चाबाबत चिंतेत राहाल. व्यवसायात अपेक्षित लाभ न मिळाल्याने काळजी असेल. कौटुंबिक वाद आज संपुष्टात येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ एकांतात घालवाल. हितशत्रू नोकरीत असलेल्या लोकांवर वर्चस्व गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, त्यांना अटकाव करावा  लागेल.
  8. वृश्चिक- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. गोड बोलून तुम्ही लोकांची मने जिंकू शकाल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही मुलाच्या भविष्याशी संबंधित काही योजनांवर चर्चा करू शकता. तुम्हाला काही गुप्त पैसे मिळू शकतात.
  9. धनु- व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कठीण जाईल, परंतु भावांच्या मदतीने तुम्ही अडचणीतून मुक्त होऊ शकता. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही, त्यामुळे निर्णय समोर ढकला.
  10. मकर- आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असणार आहे. काही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल. मोठी गुंतवणूक करणे टाळावे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कमकुवत विषयांवर मेहनत करूनच यश मिळेल. आज तुम्हाला काही जुन्या जबाबदाऱ्यांबद्दल काळजी वाटेल.
  11. कुंभ- आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असू शकतो. तुम्हाला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर त्यातही संयम बाळगणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
  12. मीन- नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. त्यांच्या मनाप्रमाणे काम मिळाल्याने ते अधिक आनंदी होतील.  तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून गोड बोलून तुमचे काम सहज करून घेऊ शकाल, ज्यांना नोकरीसोबतच कोणतेही ऑनलाइन काम करायचे आहे, ते त्यात यशस्वीही होतील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती