AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या राशीच्या लोकांचा आज इतर लोकांवर राहणार प्रभाव

मेष- येणाऱ्या काही दिवसांत आजची मेहन खूप उपयुक्त ठरेल. पैसे मिळवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. जवळच्या मित्रांना तुमच्या मनातील गोष्टी सांगा यामुळे समस्या सुटेल. आपण कुटुंबासाठी पुरेसा वेळ काढण्यास सक्षम असाल. वृषभ- तुम्हाला जीवनात प्रगतीसाठी आपल्याला नवीन मार्ग मिळतील. तुमच्या मनात आलेल्या नवीन कल्पनांचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या […]

Astrology: या राशीच्या लोकांचा आज इतर लोकांवर राहणार प्रभाव
राशी भविष्य
| Updated on: Jul 24, 2022 | 5:30 AM
Share
  1. मेष- येणाऱ्या काही दिवसांत आजची मेहन खूप उपयुक्त ठरेल. पैसे मिळवण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. जवळच्या मित्रांना तुमच्या मनातील गोष्टी सांगा यामुळे समस्या सुटेल. आपण कुटुंबासाठी पुरेसा वेळ काढण्यास सक्षम असाल.
  2. वृषभ- तुम्हाला जीवनात प्रगतीसाठी आपल्याला नवीन मार्ग मिळतील. तुमच्या मनात आलेल्या नवीन कल्पनांचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी एखाद्या वरिष्ठ सदस्याच्या सल्ल्याची आवश्यकता असू शकते. एखाद्या कठीण समस्येचं निराकरण करण्यास तुम्ही सक्षम असाल.
  3. मिथुन- शनिवारी तुम्ही समस्यांमधून बाहेर पडाल. नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे, म्हणून वेळेचा योग्य वापर करा. नफ्यासाठी संधी मिळेल. तरुणांना नवीन नोकरी मिळू शकते. मित्र आणि जीवन साथीदाराच्या सहकार्याने मार्ग सोपा होईल.
  4. कर्क- तुमच्या कामाच्या क्षेत्रातील प्रयत्नांमुळे प्रगती होईल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी यश मिळू शकतं. तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. नोकरीमध्ये तुमची मेहनत कामी येईल.
  5. सिंह- कोणतंही काम करण्यासाठी घाई करू नका. प्रयत्नांना फळ मिळेल. ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांची कामगिरी चांगली असेल. पैशाच्या आगमनाने तुम्हाला आनंद मिळेल. जास्तीत जास्त उत्पन्नाचा प्रयत्न कराल आणि यशस्वी होईल.
  6. कन्या- आजचा दिवस तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असू शकतो. कमी प्रयत्नाने तुम्हाला अधिक नफा मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित मित्राच्या मदतीने तुम्ही प्रगती करू शकता. आज तुमचा बॉस तुम्हाला प्रोत्साहित करेल.
  7. तूळ- तुमचा दिवस चांगला असणार आहे. तुमचा सकारात्मक व्यवहार लोकांना प्रभावित करण्यास मदत होईल. आपण पैसे मिळवण्यासाठी आणि आपली बचत वाढवण्यासाठी अधिक परिश्रम कराल आणि त्यामध्ये यशस्वी देखील होऊ शकता.
  8. वृश्चिक- तुम्ही खूप आनंदी रहाल. योग्य दिशेने कठोर परिश्रम करा. जेणेकरून अधिक काम केलं जाईल. कोणत्याही संपत्तीमध्ये पैसे गुंतवू शकता. घरात बांधकाम किंवा दुरुस्ती करायची असल्यास वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या.
  9. धनु- तुमचं मन आज उत्साही असेल. ज्येष्ठांचं मार्गदर्शन केल्यास नफ्यात वाढ होईल. बर्‍याच दिवसांपासून प्रयत्न करत असलेली प्रॉपर्टी मिळवण्यात यश मिळेल. शेजार्‍यांचं सहकार्य फायद्याचं ठरेल.
  10. मकर- मनामध्ये चांगल्या भावना येतील. कामाच्या संबंधात तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळतील. आयटी उद्योगाशी संबंधित लोकांसाठी हा चांगला काळ आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे.
  11. कुंभ- तुमची उत्साही वागणूक तुमच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करेल. पैसे मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. मार्केटींगशी संबंधित लोकांसाठी हा दिवस फायदेशीर ठरणार आहे.
  12. मीन- कला क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचं कौशल्य दर्शविण्याची उत्तम संधी मिळेल. पैसे कमवण्यासाठी छोटे मोठे प्रवास सुरु राहतील. व्यावसायिकांना गुंतवणूकीसाठी योग्य वेळ येईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.