AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : असा असतो मेष राशीच्या लोकांचा स्वभाव, आर्थिक स्थिती आणि वैवाहिक जिवनात येतात हे अनुभव

तुम्हाला मेष राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव माहीत आहे का? सर्व राशीच्या चिन्हांपैकी, प्रथम मेष लोकांमध्ये (Aries people) आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता, स्वतःते वेगळेपणा सिद्ध करण्याची तीव्र भावना असते.

Astrology : असा असतो मेष राशीच्या लोकांचा स्वभाव, आर्थिक स्थिती आणि वैवाहिक जिवनात येतात हे अनुभव
मेष राशी
| Updated on: May 01, 2023 | 7:19 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) तीन राशींना अग्नि तत्वाची राशी मानली जाते. यामध्ये मेष, सिंह आणि धनु या राशींचा समावेश आहे. या राशींमध्ये भरपूर ऊर्जा आणि अग्नि आहे. या राशींसाठी सूर्य सर्वात महत्वाचा आहे. या राशींना धैर्य, नेतृत्व आणि क्रोधाची चिन्हे मानली जातात. तुम्हाला मेष राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव माहीत आहे का? सर्व राशीच्या चिन्हांपैकी, प्रथम मेष लोकांमध्ये (Aries people) आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता, स्वतःते वेगळेपणा सिद्ध करण्याची तीव्र भावना असते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती भेटली असेल जी स्पष्ट वक्ता , ठामपणे विचार मांडणारे स्वभावाने हट्टी असेल तर त्यांची राशी मेष असू शकते.

प्रथम मेष राशीच्या लोकांचे स्वभाव गुण जाणून घेऊया

मेषेच्या व्यक्तींची शारीरिक ठेवण

मेष राशि चक्रातील मूळ लोक स्वतःला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य देतात. कुठलेही कार्य पूर्ण करताना ते अगदी नीटनेटके असावेत असा प्रयत्न करतात. या राशीच्या व्यक्तींचे डोळे आणि कान नेहमीच उघडे असतात. मेषेच्या व्यक्तींचा चेहरा बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की, त्यांच्या भुवया वरच्या दिशेने वाकलेल्या असतात. त्यांना कोणतंही काम द्या, ते करतील पण त्यांचं प्राधान्य नेहमीच सुरक्षेला असेल.

मेष व्यक्तिमत्व

मेष राशीचे लोक बहुधा त्यांच्या परोपकारी स्वभावासाठी ओळखले जातात. याशिवाय, त्यांना घाईघाईने गोष्टी पूर्ण करण्याची सवय देखील आहे, कारण मंगळ त्यांचा अधीश आहे. मेषेचे लोक काटेकोर आरेखनांसाठीही ओळखले जातात.

मेष राशीच्या लोकांचे छंद

मेष राशीच्या लोकांचा फार कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता नसलेल्या पण घसघशीत कमाई देणाऱ्या क्षेत्रात रस असतो. लॉटरी बेटिंग यामध्ये मेषेचे लोक अधिक दिसतील. याशिवाय अभिनय, नृत्य अशा ज्या कलांमधून ते आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन करू शकतात त्याकडेही त्यांचा कल असतो.

मेष राशीय लोकांचे दोष

मेष व्यक्तींना सहज राग येतो आणि ते स्वतःचा अपमान सहन करू शकत नाहीत. हट्टी असण्याबरोबरच, ते सहसा आपल्या चुका मान्य करत नाहीत. अगदी मोठी किंमत मोजावी लागेपर्यंत ते चूक कबूल करत नाहीत. मेष राशीच्या लोकांचा नेहमीच त्यांच्या कुटुंबातील एखाद्या विशिष्ट सदस्याबरोबर असंतोष असतो.

मेष मूळचे शिक्षण आणि व्यवसाय

मेषेच्या व्यक्तींना त्यांच्या मेंदूशी निगडित कामं सहजपणे करण्याची सवय असते. म्हणूनच ते शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत. जर आपण त्यांच्या व्यवसायातील संभाव्यतेबद्दल चर्चा केली तर त्यांना रिअल इस्टेट, मालमत्ता, क्रीडा, खाणकाम, कोळसा इत्यादी व्यवहारातील व्यापारा चांगला फायदा मिळू शकतो.

मेषेच्या लोकांचं प्रेमजीवन

मेषेचे लोक प्रेमात अर्धवट यशस्वी होतात. ते आपल्या मनपसंत जोडीदारासमवेत पुरेसा अर्थपूर्ण वेळ घालविण्यात अपयशी ठरतात. या राशीच्या महिला काहीशा गर्विष्ठ वाटू शकतात. त्यांना नेहमीच्या आणि टिपिकल प्रेमिकेसाठीच्या भेटवस्तू देऊन सहजासहजी प्रसन्न करता येत नाही.

मेष राशीच्या लोकांचे वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन

या राशीच्या पुरुषांना त्यांची पत्नी नेहमीच सक्रिय आणि आकर्षक राहावी अशी इच्छा असते. मेष लोकांना प्रेमामध्ये पूर्णपणे खात्री हवी असते. ते जोडीदाराबद्दल खूपच आदर्शवादी असतात, त्यामुळे नवरा-बायकोच्या नात्यात वाद होऊ शकतात. मेषेच्या व्यक्तींना समाजात मानाचं स्थान असतं.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.