Astrology : तुळ राशीत सूर्य करणार राशी परिवर्तन, कर्क आणि मिथून राशीच्या लोकांसह या राशीच्या लोकांना होणार लाभ

र सूर्यदेव दर महिन्याला आपली राशी बदलतात. हिंदू कॅलेंडरनुसार, सूर्य  18 ऑक्टोबर रोजी सकाळी 1.42 वाजता कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. ज्या जोडप्यांना अपत्य पाहिजे आहे त्यांना गोड बातमी मिळू शकते. या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते.

Astrology : तुळ राशीत सूर्य करणार राशी परिवर्तन, कर्क आणि मिथून राशीच्या लोकांसह या राशीच्या लोकांना होणार लाभ
सूर्य राशी परिवर्तन
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 11, 2023 | 3:34 PM

मुंबई : भारतीय ज्योतिषशास्त्रात (Astrology) सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा स्वामी मानले जाते. सूर्य देव कोणत्याही राशीमध्ये 30 दिवस वास्तव्य करतात आणि त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. यानुसार सूर्यदेव दर महिन्याला आपली राशी बदलतात. हिंदू कॅलेंडरनुसार, सूर्य  18 ऑक्टोबर रोजी सकाळी 1.42 वाजता कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. सूर्याचा हा राशी बदल काही राशींसाठी शुभ परिणाम देऊ शकतो. येथे जाणून घ्या कोणत्या राशींना सूर्याच्या भ्रमणाचा खूप फायदा होऊ शकतो.

या राशीच्या लोकांना होणार विशेष लाभ

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना सूर्याच्या भ्रमणाचा खूप फायदा होईल. ज्या जोडप्यांना अपत्य पाहिजे आहे त्यांना गोड बातमी मिळू शकते. या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. बुध मिथुन राशीचा स्वामी आहे, त्यामुळे सूर्य आणि बुध यांचे हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना सूर्याच्या भ्रमणाचा खूप फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभासोबतच तुम्ही समाजात उच्च पदावरही पोहोचू शकता. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि विवाह देखील लवकरच होईल. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र आणि सूर्य यांचे संयोजन नेहमीच शुभ फल देते. जे लोकं नवीन घर घेण्याच्या तयारीत आहेत त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण फलदायी ठरणार आहे. सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. अशा परिस्थितीत सूर्याच्या राशीतील बदलामुळे चांगली बातमी मिळेल. सूर्याच्या संक्रमणामुळे कुटुंबात शांतता राहील. सिंह राशीच्या लोकांना जुन्या आजारापासून आराम मिळू शकतो. तब्येत सुधारू शकते. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण चांगले राहील. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात सुख-शांती नांदेल. एखाद्याशी दीर्घकाळ चाललेला वाद संपुष्टात येईल. कुटूंबात परस्पर संवाद वाढेल. अजकलेले पैसे परत मिळतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)