Surya In Rohini Nakshatra : सूर्याचं 8 जून 2023 पर्यंत रोहिणी नक्षत्रात ठाण, पाच राशींना होणार फायदा

ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांची मांडणी करण्यात आली आहे. गोचर कालावधीनुसार ग्रह राशी आणि नक्षत्र बदल करत असतात. त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो.

Surya In Rohini Nakshatra : सूर्याचं 8 जून 2023 पर्यंत रोहिणी नक्षत्रात ठाण, पाच राशींना होणार फायदा
Surya In Rohini Nakshatra : सूर्याच्या रोहिणी नक्षत्रातील गोचरामुळे पाच राशींना मिळणार लाभ, कशी असेल स्थिती वाचा
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 4:14 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करत असतो. 25 मे रोजी सूर्य ग्रह चंद्राच्या नक्षत्र राशीत आला आहे. सूर्यदेव या राशीत 8 जून 2023 पर्यंत राहणार आहे. या तारखेला संध्याकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी मृगशिर्षा नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्याला ग्रहमंडळात राजाचा दर्जा देण्यात आला आहे. तर रोहिणी नक्षत्र हे चंद्राचं प्रिय नक्षत्र आहे. त्यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर या गोचराचा परिणाम दिसून येईल. पण पाच राशींना या गोचराचा सर्वाधिक फायदा होईल. चला जाणून घेऊयात या पाच राशी कोणत्या आहेत त्या…

सूर्य ग्रहाचा रोहिणी नक्षत्रातील गोचराचा परिणाम

मेष : सूर्याच्या या गोचरामुळे मेष राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. त्याचबरोबर आपल्या गोड बोलण्याने काही चांगले संबंध प्रस्थापित होतील. दूरचे नातेवाईक घरी येतील. त्यांचा चांगल्या प्रकारे आदरतिथ्य केल्याने त्यांची तुम्हाला चांगली मदत होईल. या काळात तुम्ही शत्रूपक्षावर हावी व्हाल.

वृषभ : सूर्याच्या रोहणी नक्षत्रातील प्रवेशामुळे या राशीच्या जातकांवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं तेज दिसून येईल. त्यामुळे काही लोकं तुमच्याकडे आकर्षित होतील. या काळात तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. समाजात मान सन्मान मिळेल. तसेच समाजात प्रतिष्ठा वाढेल.

कर्क : सूर्यदेव रोहिणी नक्षत्रासोबत कर्क राशीच्या 11 व्या स्थानात असणार आहे. यामुळे जातकांना धनयोगाचा लाभ मिळेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आर्थिक मिळकतीचे स्रोत चांगले राहतील. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव समाजावर पडलेला दिसून येईल. लोकं तुमचं म्हणणं ऐकून त्यावर अमलबजावणी करतील.

सिंह : या राशीच्या दहाव्या स्थानात गोचर असणार आहे. गेल्या काही दिवसापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळताना दिसेल. त्याचबरोबर करिअरमध्ये काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याची संधी मिळेल. एकंदरीत सूर्याच्या प्रभावामुळे व्यक्तिमत्त्वात भारदस्तपणा येईल.

धनु : या राशीच्या सहाव्या स्थानात सूर्यदेव गोचर करणार आहेत. या काळात शत्रूपक्षावर हावी व्हाल. मेहनतीचं अपेक्षित फळ मिळाल्याने आनंदी राहाल. कुटुंबाची चांगली साथ तुम्हाला या काळात मिळेल. तसेच जोडीदाराकडून मोठी मदत तुम्हाला होईल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डोक्यावरील भार हलका होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.